आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Banking News In Marathi, Bank Doing Work One Day Before, Divya Marathi

एक दिवस आधीच हिशेब बंदीची गजबज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- शासकीय कार्यालये, बॅँकांसह विविध वित्तीय संस्थांमधील कर्मचारी मार्चअखेरच्या कामात व्यग्र आहेत. त्यातच 30 मार्च रोजी रविवार आणि 31 मार्च रोजी गुढीपाडवा येत असल्याने एक दिवस आधी म्हणजे उद्या शनिवारीच सर्व हिशेब बंद करावे लागणार आहेत. त्यामुळे रविवारी सुटीच्या दिवशीही कर्मचारी कामात व्यग्र राहणार आहेत.
1 एप्रिल ते 31 मार्च असे आर्थिक वर्ष असते. या काळात झालेल्या सर्व व्यवहारांची आकडेमोड 31 मार्चला पूर्ण करावी लागते. दरवर्षी मार्च महिना सुरू झाल्यावर शासकीय कार्यालयांसह बॅँका, पतसंस्थांमध्ये वर्षभरात झालेला खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसविण्यासाठी कर्मचार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागते. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून बॅँका व शासकीय कार्यालयातील कर्मचारी दिवसरात्र काम करून हिशेब पूर्ण करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रविवारी (दि.30) सुटी असतानाही अनेक कर्मचारी कार्यालयात हजर राहून मार्च एंडिंगची कामे पूर्ण करणार आहेत. त्यादृष्टीने सर्वच शासकीय कार्यालयात नियोजन केले गेले आहे. यंदा 31 मार्चला सोमवार असल्याने सर्व व्यवहार दोन दिवस आधीच म्हणजे 29 मार्चला बंद करण्याची सूचना सर्व कर्मचार्‍यांना देण्यात आली आहे. कोषागार कार्यालयातर्फे तशाच पद्धतीने कामकाज करण्यात येत आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचार्‍यांची मोठय़ा प्रमाणावर धावपळ सुरू आहे. शासनातर्फे विविध योजना राबविण्यासाठी प्राप्त होणारा निधी 31 मार्चपूर्वी खर्च करावा लागतो. अन्यथा तो लॅप्स होण्याची शक्यता असते. त्यामुळेच जिल्हा परिषदेसह महापालिकेत निविदा काढण्यासह वर्कऑर्डर देण्यावर भर देण्यात आला आहे. विकासकामे मार्गी लावण्यासाठी नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य धावपळ करत असल्याचे चित्र आहे

मार्चअखेर होणारी गर्दी लक्षात घेता नागरिकांसह कुणाचीही गैरसोय होऊ नये, यासाठी कोषागार कार्यालय, बॅँका आणि महापालिकेचा वसुली विभाग रविवारी, सोमवारी पूर्ण वेळ सुरू ठेवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या वसुली विभागात मालमत्ता कर, पाणीपट्टी भरण्यासाठी इतर दिवसांच्या तुलनेत अधिक शुक्रवारी गर्दी होती.

300 कोटींचे दैनंदिन व्यवहार
01शासकीय कोषागार कार्यालय
31मार्च शासकीय निधी खर्चासाठी मुदत
30राष्ट्रीयीकृत बॅँकांच्या शाखा