आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 फुटी वडाचे केले रोपण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सुखी संसारासाठी एकच पती सात जन्म मिळावा, यासाठी महिला वटपौर्णिमेची पूजा करतात. आपल्या पतीची साथ जन्मोजन्मी मिळावी, पतीला दीर्घायुष्य लाभावे, अशी मनोकामना करीत ही पूजा केली जाते. परंतु पूजेसाठी लागणार्‍या वडाच्या 11 फुटी झाडाचे रोपणच महिलांनी केले आहे. वटसावित्री पौर्णिमेनिमित्त महिलांनी पर्यावरणाचा संदेशच दिला.
येथील आरएमएस कॉलनी आशाबाबानगर परिसरात अनेक वर्षांपासून वडाचे झाडच नव्हते. त्यामुळे येथील महिलांना वटसावित्रीची पूजा करण्यापासून वंचित राहावे लागे अन्यथा आजूबाजूच्या परिसरात जाऊन पूजा करावी लागत असे.
यासाठी महिलांनी बुधवारी चक्क वडाचे झाड लावले. सार्जशृंगारासह नटून थटून महिला ही पूजा करीत असतात. मराठी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला ही पूजा केली जाते. पूजेचे साहित्यदेखील बाजारात उपलब्ध असते. सौभाग्याचं लेणं असणार्‍या बांगड्या, हळद-कुंकू यासारख्या गोष्टींचा यात समावेश असतो. वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत दिवसभर उपवास करीत महिला पूजेची सांगता करतात. या पूजेसाठी वडाच्या झाडाचे महत्त्व असल्याने या शिवाय ही पूजा पूर्ण होत नाही.
परिसरापासून वडाचा वृक्ष असलेला भाग दूर असल्याने अनेक महिला पूजाच करायच्या नाही. येथे पिंपळाच्या झाडाला वडाच्या दोनच फांद्या असल्याने नाईलाजास्तव ही पूजा केली जायची. परिसरातील चंद्रकांत वाघ यांनी जळगावच्या नर्सरीतून 11 फुटाचे 700 रुपयांचे वडाचे झाड आणून दिले. त्यामुळे महिलांचा उत्साहदेखील वाढला. महिलांनीच यासाठी 3 फूट मातीचा खड्डा खोदला. झाड लावण्याची सगळी तयारीदेखील महिलांनीच केली. 12 ते 15 महिलांच्या समूहाने याची तयारी केली. येथील महिलांनी अष्टविनायक गणपती महिला मंडळसुद्धा स्थापन केले आहे.