आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुजार्‍याकडूनच पिंपळाच्या वृक्षाची कत्तल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- बेकायदा वृक्षतोड करणार्‍या 12 जणांवर वर्षभरात गुन्हे दाखल झालेले असतानाही अद्याप यावर प्रतिबंध आणणे प्रशासनाला शक्य झालेले नाही. हिंदुधर्मात महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या पिंपळ वृक्षाची मंदिराच्याच पुजार्‍याने कत्तल केली आहे. बुधवारी शासकीय सुटी असल्याची संधी साधत पुजार्‍याने ही कामगिरी केली आहे.

मेहरूणमधील पुरातन पंचमुखी महादेव मंदिराला लागून मंदिराचे पुजारी लक्ष्मीनारायण शर्मा (भट) राहतात. त्यांच्या निवासस्थानाजवळ सुमारे 40 ते 50 वर्षांपूर्वीचे मोठे पिंपळाचे झाड आहे. दोन-तीन दिवसांपासून वृक्षाच्या फांद्यांची तोड सुरू होती. बुधवारी शासकीय सुटी असल्याने वृक्षाच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू होते. दोन फूट व्यासाचा बुंधा असलेल्या या पुरातन वृक्षाच्या तोडीसाठी परवानगी नगरसेवकांकडून घेण्यात आल्याचे पुजार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचे नगरसेवक सुनील महाजन यांनी स्पष्ट केले आहे.

वृक्ष प्राधिकरणाची परवानगी नाही
पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची बैठक 35 प्रस्ताव विचाराधीन होते. यात पंचमुखी महादेव मंदिर किंवा लगतच्या भागातील वृक्षतोड किंवा फांद्या तोडण्याचा कोणताही विषय नाही. त्यामुळे परवानगी घेतल्याचा बनाव पुजार्‍याकडून करण्यात येत आहे.