आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंपरा : पिंप्राळ्यात बारागाड्या ओढताना भाविकांनी अनुभवला 9 मिनिटांचा थरार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंप्राळ्यातील उत्सवाला १९४९ पासूनची परंपरा आहे. कै. भावडू टिंभा चौधरी यांनी बारागाड्या ओढण्याच्या उत्सवाला सुरुवात केली. ६७ वर्षांपासून उत्सवाची परंपरा आजही कायम टिकून आहे. गेल्या पाच वर्षांपासून बारागाड्या भगत हिलाल भील ओढत आहेत.
उत्सवाच्या पूर्वसंध्येला हिलाल भील यांच्या घरी भगतकाठीची स्थापना करण्यात येते. त्यानंतर रात्री १२ वाजता परिसरातील सर्व देवांची पूजा करून त्यांना आमंत्रित करण्यात येते. या उत्सवाची महिनाभरापासून तयारी सुरू होते. यात सर्व नागरिक कुठलाही भेदभाव करता स्वत: सहभागी होतात.
यात्रोत्सव, बारागाड्यांमुळे पिंप्राळा दुमदुमले

पिंप्राळ्यात गेल्या ६७ वर्षांपासून अक्षय्य तृत्तीयेला बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यंदादेखील मंगळवारी भवानीदेवी मंदिर, अहिर सुवर्णकार पंच मंडळ ग्रामस्थांतर्फे भवानीदेवीचा यात्रोत्सव बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भगत हिलाल बोरसे यांनी सायंकाळी ६.३५ वाजता महामार्गाजवळील रेल्वे उड्डाणपुलापासून बारागाड्या ओढण्यास सुरुवात केली. अवघ्या नऊ मिनिटांत म्हणजे सायंकाळी ६.४४ वाजेपर्यत बोरसे यांनी तलाठी कार्यालयापर्यंत गाड्या ओढून नेल्या. हा नऊ मिनिटांचा थरार पाहताना अनेकांच्या अंगावर शहारे उभे राहिले होते.