आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारसे खून प्रकरण दोघांनी दिली खुनाची कबुली; चौथ्या दिवशी निवळला तणाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील वाल्मीक चौकात प्रख्यात मल्ल मोहन बारसेंची निर्घृण हत्या झाल्याने शुक्रवारपासून असलेला तणाव सोमवारी निवळला. आठवडे बाजार, सराफा बाजार, चुडी मार्केट, कपडा मार्केटमधील व्यवहार सुरळीत सुरू झाले. अफवांचा बाजारही शांत झाल्याने पोलिसांनी आता सुटकेचा नि:श्वास सोडला असला, तरी संवेदनशील भागात चोख बंदोबस्त आहे.

खुनाच्या घटनेनंतर ज्या चौकांमध्ये अफवा पसरवल्या जात होत्या, त्या ठिकाणी पोलिस लक्ष ठेवून आहेत. वाल्मीक चौकात तर गेल्या चार दिवसांपासून आठ ते १० पोलिसांचा ताफा गाडीसह तैनात हे. अपर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे स्वत: चार दिवसांपासून शहरात तळ ठोकून हेत. अटकेतील रोपी गोपाळ शिंदे नट्टू चावरिया या दोघांना घटनास्थळी णून त्यांच्याकडून पोलिसांच्या पथकाने गुन्ह्याची माहिती जाणून घेतली. दोघांनीही खुनाची कबुली दिली असून त्यात या प्रकरणाला ‘यू-टर्न’ मिळाला हे.

चारसंशयित रोपींचा शोध सुरू
खूनप्रकरणीबाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपी अनिल छबीलदास चौधरी, बंटी परशुराम पथरोड, विजय परशुराम पथरोड, जॅकी इंदल पथरोड या चौघांचा शोध सुरू हे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके नियुक्त करण्यात ली असून ते मागावर हेत. घटनेची तीव्रता लक्षात घेऊन तैनात केलेला बंदोबस्त णखी ठवडाभर कायम राहणार असल्याचे संकेत हेत. माजी मदार संतोष चौधरी अनिल चौधरींच्या घराजवळ साेमवारीही बंदोबस्त होता.

पोलिसांवर राजकीय दबाव नाही
पोलिसांवर कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही. पडद्यामागील सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. गुन्ह्यातील जे खरे रोपी हेत, त्यांना सोडणार नाही. मात्र, खोट्या रोपींना विनाकारण अडकवणार नाही. शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीचा बिमोड करू नंदकुमारठाकूर, अपर पोलिस अधीक्षक, जळगाव

त्रयस्थ साक्षीदार हवे
वाल्मीकचौकात वर्दळीच्या रस्त्यावर मोहन बारसेंचा खून झाला. ज्याचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही, अशा त्रयस्थ साक्षीदाराच्या शोधात पोलिस हेत. तसेच शहरातील वाल्मीकनगर, दीनदयाळ नगरात पोलिसांच्या यादीवरील गुन्हेगारांची तपासणी मोहीम राबवण्यात ली. त्यात धीरज खरारे, मंगल उज्जैनवाल, जयकिशन पथरोड, शम्मी चावरिया, धीरज चावरिया, बंटी पथरोड, विजय पथरोड, गौतम चव्हाण, राहुल पथरोड, शेख कलीम शेख सलीम हे घरी सापडले नाहीत. शेख चाँद शेख हमीद, अमीन उर्फ या रशीद बागवान हे पोलिसांना मिळून आले.

...तर फिर्यादीवरच गुन्हा नोंदवणार
^पोलिसांचीदिशाभूल करून खाेटा गुन्हा दाखल झाल्यास फिर्यादीविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात येईल. मिथून माेहन बारसे यांच्या घरात रविवारी जप्त केलेल्या पिस्तूलसंदर्भात कसून तपास सुरू हे. हे पिस्तूल काेणी णि कुणाकडून णले? ही माहिती संकलित करण्याचे काम प्रगतिपथावर हे. शहरवासियांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. किसनराजनजनपाटील, निरीक्षक, बाजारपेठ पाेलिस ठाणे, भुसावळ

कोम्बिंग ऑपरेशन
वाल्मीक नगरातरविवारी बारसेंच्या घरात अज्ञात व्यक्तींनी पिस्तूल फेकल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर बाजारपेठ पोलिसांनी सोमवारी पहाटे चार ते साडेपाच वाजेदरम्यान या भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवले. पोलिसांच्या यादीवरील गुन्हेगार येथून पसार झाल्याची माहिती यातून समोर ली. डीवायएसपी रोहिदास पवार, निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या पथकाने संशयितांच्या घरांची झाडाझडती घेतली. बाजारपेठचे डीबीचे पथक, रसीपी प्लाटून पोलिसांचा ताफा तैनात होता. कोम्बिंग ऑपरेशनमध्ये संशयास्पद वस्तू ढळल्या नाहीत, अशी माहिती पोलिसांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.