आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपात खासगी बँकांचा आधार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपामुळे बँकांचे निम्मे व्यवहार प्रभावी झाले. मात्र, खासगी, सहकारी बँकांची सेवा सुरू असल्याने ग्राहकांना पर्याय उपलब्ध झाला तर एटीएम, डिपॉझिट मशीन आणि नेट बँकिंगसारख्या ई-सुविधांमुळे 21 बँका बंद असूनही ग्राहकांची गैरसोय टळली.
विविध प्रलंबित मागण्यांसाठी बँक अधिकारी, कर्मचारी संघटनांनी सोमवारी संप पुकारला. बँक संपामुळे व्यवहार रखडले असले तरी खासगी बँका आणि इतर सुविधांमुळे ग्राहकांना पर्यायी व्यवस्था करता आली. एटीएममुळे पैसे काढण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला तर एचडीएफसीने चालविलेल्या क्लिअरींग हाउसमध्ये 2370 व्यवहार निपटले गेले. संप मंगळवारीदेखील सुरूच राहणार आहे.
कर्मचार्‍यांनी केली निदर्शने
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेसमोर युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉइजतर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी के.बी.जैन, आर.पी.कुळकर्णी, व्ही.आर. खेडकर, भालचंद्र कोतकर, अरविंद देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. किशोर सुर्वे, मधू अहिरे, पुरुषोत्तम चव्हाण, बी.टी.सोनार उपस्थित होते तर शिवसेना प्रणीत बँक कर्मचारी, अधिकारी सेना महासंघाने संपाचा विरोध केला. या संघटनेचे अधिकारी, कर्मचारी कामावर उपस्थित असल्याचा दावा बाळकृष्ण पातोडे यांनी केला आहे.
या बँका होत्या बंद
स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आंध्रा बँक, कॅनरा बँक, अलाहाबाद बँक, देना बँक, पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट बँक, विजया बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, बँक ऑफ हैद्राबाद, इंडियन बँक, इंडियन ओवरसीज बँक, ओरिएण्टल बँक ऑफ कॉर्मस, महाराष्ट्र ग्रामीण बँक, फेडरर बँक, युको बँक.
या बॅँकांचे होते व्यवहार सुरू
आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, आईडीबीआय, अँक्सिस बॅँक, यस बँक, कोटक महिंद्रा, आयएनची वैश्य, जिल्हा मध्यवर्ती, जळगाव जनता बँक, जळगाव पीपल्स बँक, बीएचआर पतसंस्था.