आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Battle For Rehabilitation Continue Medha Patakar

विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी संघर्ष सुरूच ठेवणार : मेधा पाटकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नर्मदा सरदार सरोवर धरणातील विस्थापितांच्या पुनर्वसनाचा लढा ३० वर्षांपासून सुरू आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र गुजरात या तीन राज्यातील विस्थापितांच्या पुनर्वसनाचा हा प्रश्न आहे. पुनर्वसनाच्या आंदोलनातून उठलेले हे प्रश्न केवळ विस्थापित आणि पुनर्वसनाचे नाहीत, तर जलनियोजन, पर्यावरणाशी ही संबंधित आहेत. निष्क्रीय राज्यकर्त्यांनी याकडे पाठ फिरवली असली तरी आंदोलकांचा हा संघर्ष यापुढेही सुरूच राहणार असल्याचे प्रतिपादन नर्मदा बचाव आंदोलनाच्या ज्येष्ठ नेत्या मेधा पाटकर यांनी केले. रविवारी मायादेवीनगरात रोटरी वेस्टतर्फे आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या.

पाटकर म्हणाल्या की, प्रश्नाचे जाळे घेऊन ३० वर्षे हे आंदोलन चालले, यापुढे या नद्या- खोऱ्यांचे भविष्य काय असणार याची चिंता आहे. धरणाची २१४ किलोमीटरची अद्भूत लांबी आहे. बाजार भांडवलदार, गुंतवणूकदारांचा सन्मान वाढत असताना छाती फाडली तरी हे धरण होईल की नाही, अशी भीती आहे. विश्व बंॅकेने याकडे पाठ फिरवली आहे. मात्र, सरकार यावर विचार करायला तयार नाही. धरणाची उंची १७ मीटरने वाढवली गेली आहे. मात्र, या शासनाची हिंमत नाही. नर्मदेच्या बाबतीत की सत्यवादी भूमिका घेऊ शकेल. इतकी निराशा या हताश केंद्रीय मंत्रिमंडळापुढे आहे. अडीच ते तीन लाख लोक या बुडीत क्षेत्रात आहेत. सरदार पटेलांच्या पुतळ्याच्या खर्चापेक्षा या सरदार धरणाचा खर्च कमी आहे. मात्र, आमचे आंदोलन सुरू आहे. थांबलेले नाही, असे त्यांनी सांगितले. रोटरीचे अध्यक्ष सुनील अग्रवाल, खलील देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. राजेश परदेशी यांनी परिचय करून दिला. शंभू पाटील यांनी नियोजन केले.

प्रदूषणामुळे नर्मदा काळी बनते
विकासाच्यानावाने जलग्रहण क्षेत्रातील पाणी अडवण्याचे काम होत आहे. नद्या- नाले कुंठीत करण्याचा खेळखंडोबा सरकारने सुरू केला असून याकडे लक्ष देण्याचे कष्टही सरकार घेत नाही. प्रदूषणामुळे नर्मदा काळी बनत चालली आहे, ही स्थिती आहे. यावर नियंत्रण आणण्याची गरज अाहे. जनतेने आंदोलकांची भूमिका जाणून घेण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी लढ्याचा संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.