आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचायत समिती सभापतींसह 8 जणांवर अॅट्राॅसिटी गुन्हा; बीडीअाे अात्महत्येचा प्रयत्न प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव- पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांनी गुरूवारी (दि.२) विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्यांनी शनिवारी रात्री उशिरा दिलेल्या जबाबानुसार चाळीसगाव पंचायत समिती सभापती, उपसभापती यांच्यासह आठ जणांविरुद्ध अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

गटविकास अधिकारी वाघ यांनी पंचायत समितीची मासिक सभा सुरू असताना आपल्या कार्यालयात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेच्या काही दिवस अगोदर मनरेगा विहिरींचा घोळ व रोजगार हमी योजनेतील कामांची अनियमितता यावरून पंचायत समिती सभापती व सदस्यांनी सीईअाेंकडे वाघ यांची  तक्रार केली होती. त्यावरून सीईअाेंनी वाघ यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. नुकतेच ते रुजू झाले हाेते.

बीडीओंनी विषारी औषध प्राशन केल्यानंतर त्यांना तातडीने शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. बीडीओ वाघ यांचा जबाब नोंदवण्यासाठी अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी अरविंद पाटील, पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील, तपास अधिकारी उपनिरीक्षक राजेश घोळवे तीन-चार वेळा जाऊन आले होते. मात्र प्रकृती अस्वस्थतेच्या कारणामुळे पोलिसांना दोन दिवस त्यांचा जबाब नोंदवता आला नव्हता. 
 
चाैकशी अहवाल अाज
नाशिक विभागीय आयुक्तांनी सात सदस्यांची चौकशी समितीची नेमणूक केली होती. या समितीने शनिवारी व रविवारी सुटीच्या दिवशीही चौकशी केली. घटनेच्या दिवशी पंचायत समितीत मासिक सभा सुरू असताना जे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांना त्या दिवशी नेमके काय घडले याची विचारणा करीत चाैकशी समितीने सर्वांचा लेखी जबाब त्याच्या स्वहस्ताक्षरात नोंदवून घेतला अाहे.  सोमवारी ही समिती आयुक्तांकडे अहवाल सोपवणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...