आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beaten News In Marathi, Womens Attack On Mandare, Divya Marathi

उपवर महिला ठेवीदारांनी केली संघर्ष समितीच्या मंडोरेंना मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पीडित उपवर मुलींना शासनाकडून देण्यात येणार्‍या रकमेस विरोध दर्शवून महिलांना अपशब्द बोलल्याच्या कारणावरून उपवर महिला ठेवीदार संघटनेतील ठेवीदारांनी राज्य ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष अशोक मंडोरे यांना मारहाण केली. गांधी उद्यानात शुक्रवारी दुपारी 12 वाजता ही घटना घडली. या प्रकरणी उपवर संघटना व ठेवीदार संघर्ष समिती यांनी एकमेकांवर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केले आहे.
बोगस लाभार्थ्यांवरून वाद
शासनाकडून जिल्ह्यातील 1702 उपवर मुलींसाठी 5 कोटी 78 लाख रुपये मंजूर झाले असून ती रक्कम जिल्हा बॅँकेत जमा आहे. यासाठी उपवर मुलींची यादी केली जात आहे. उपवर मुलींच्या संघटनेची गांधी उद्यानात चर्चा सुरू असताना ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष अशोक मंडोरे यांच्यासह जिल्हाध्यक्ष संदीपसिंह वर्मा, सदस्य उमेश वाणी, सचिन देशपांडे हे सुद्धा उद्यानात आले. या वेळी उपवर मुलींना देण्यात येणार्‍या रकमेवरून वाद झाला. यावरून महिलांनी त्यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला. यानंतर मंडोरे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात उपवर संघटनेचे गोपाळ राऊत, अश्विनी डोलारे, संजय जैन, सरला नारखेडे यांच्याविरुद्ध तर उपवर संघटनेने अशोक मंडोरे, संदीपसिंह वर्मा, उमेश वाणी, सचिन देशपांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मंडोरेची महिलांना शिवीगाळ
उद्यानात संघटनेतील वयोवृद्ध महिलांना अशोक मंडोरे शिवीगाळ करीत होते. उद्यानातील युवकांनी हे पाहिले व त्यांनी मंडोरे यांना मारहाण केली. आमच्या संघटनेतील महिलांनी मारहाण केलेली नाही. आमच्या संघटनेत एकही बोगस उपवर नाही. याबाबत तक्रार असेल तर त्यांनी कायदेशीर मार्गाने जावे. 702 उपवर मुलींचे दाखले व पावत्या आम्ही दिल्या आहेत. या मारहाणीशी मनसे ठेवीदार संघटनेचा संबंध नाही. अश्विनी डोलारे, उपवर ठेवीदार संघटनेच्या पदाधिकारी
उपवर ठेवीदारांकडून मारहाण
मी एकटा असताना उपवर ठेवीदारांनी मला मारहाण केली. ठेवीदारांकडून पैसे उकळून खोट्या याद्या देऊन पैसे वाटले जात आहेत. यास मी विरोध केला म्हणून मला मारहाण केली. ब्रासलेट हिसकावण्याचा प्रयत्नही या वेळी झाला. मोबाइलही एकतासाने मिळून आला. त्यांची यादीच बोगस आहे. कार्याध्यक्ष व जिल्हाध्यक्षांना मारहाण केल्याबद्दल आम्ही दोघांनी पोलिसांकडे स्वतंत्र तक्रारी केल्या आहेत. अशोक मंडोरे, कार्याध्यक्ष, ठेवीदार संघर्ष समिती