आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकारात्मक बातमी: टाॅवर चाैकात चाैघांची तरुणास बेदम मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जखमी राजू ऊर्फ शेख शकील - Divya Marathi
जखमी राजू ऊर्फ शेख शकील
जळगाव - टाॅवर चाैकात रविवारी सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास रिक्षात बसलेल्या गेंदालाल मिल परिसरातील तरुणाला ताेंडाला रुमाल बांधून अालेल्या चार तरुणांनी फायटरने बेदम मारहाण करून जखमी केले. तसेच या घटनेचे केशव नमकीन या हाॅटेलमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यासाठी अालेल्या पाेलिसांनी धमकी दिल्याचा अाराेप मालकाने केला आहे.

जुन्या बसस्थानकाकडून बाबुराव ऊर्फ अस्लम शेख भिकन शेख हा त्याचा मित्र राजू ऊर्फ शेख शकील शेख शाकीर (वय १८, दाेन्ही रा.गेंदालाल मिल)साेबत त्याच्या रिक्षात (एमएच-१९-व्ही-६९१३) येत हाेता. प्रवासी बसवण्यासाठी त्याने टाॅवर चाैकातील केशव नमकीन या दुकानासमाेर रिक्षा थांबवली. त्या वेळी प्रवासी बाेलावण्यासाठी बाबुराव मागे गेला. तेव्हा राजू शेख रिक्षात बसलेला हाेता. या वेळी ताेंडाला रुमाल बांधलेले चार तरुण अाले. त्यांनी राजूला अचानक फायटरने मारहाण केली अन् त्यानंतर नेहरू चाैकाकडे चाैघेही पसार झाले. त्यानंतर बाबुराव याने राजूला शहर पाेलिस ठाण्यात नेले, त्यानंतर सिव्हिलमध्ये दाखल केले. याप्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

हाॅटेल मालकाला शिवीगाळ
टाॅवरचाैकातील केशव नमकीन या हाॅटेलच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले अाहेत. त्याचे फुटेज तपासण्यासाठी शहर पाेलिस ठाण्याचे दाेन कर्मचारी गेले होते. त्यांच्यासाेबत २० ते २५ तरुणही गेले. त्यांनी हाॅटेलमध्ये गर्दी केल्यामुळे हाॅटेलमालक सच्चिंद्र मंडाेरे अाणि वीरेंद्र मंडाेरे यांनी जमावाला बाहेर जाण्यास सांगितले. त्या वेळी तरुणांनी मंडाेराबंधूंना शिवीगाळ केली. त्यानंतर पाेलिसांना मंडाेरा यांनी जमावाला बाहेर काढा, तसेच तुमचे ओळखपत्र दाखवा असे सांगितले. अाेळखपत्र मागितल्याचा पाेलिसांना राग अाला. पाेलिस कर्मचाऱ्यांनीच मंडाेरा यांना ‘तुम्हालाच मध्ये टाकताे’, अशी धमकी दिल्याचा अाराेप त्यांनी या वेळी केला. उपनिरीक्षक सुरेश सपकाळे यांनी परिस्थिती नियंत्रणात अाणली.

तक्रार देणार
पाेलिस विभागाकडून सीसीटीव्ही बसवण्यासाठी अनेक वेळा सांगण्यात येते. अाम्ही अगाेदरपासूनच कॅमेरे बसवलेले अाहेत. मात्र, रविवारी पाेलिसांनी अामच्याशी घातलेल्या हुज्जतीबाबत पाेलिस निरीक्षकांना तक्रार देणार अाहे. सच्चिंद्र मंडाेरा, संचालक,केशव नमकीन
पुढे वाचा.. शहरात कुत्र्यांनी ताेडले नऊ जणांचे लचके