आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beating At Three Spots In Jalgaon City, 9 Injured

गुन्हेवार्ता : जळगाव शहरात 3 ठिकाणी हाणामारी; 9 जण जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरातील शाहुनगर परिसरात शौचालयाच्या वादातून दोन भावांमध्ये जोरदार हाणामारी झाली. तसेच मू.जे.महाविद्यालयात किरकोळ कारणावरून दोन विद्यार्थ्यांना तर बी.जे. मार्केटमध्ये फलक लावण्याच्या कारणावरून दोन युवकांना मारहाण झाल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जळगाव | शाहुनगरपरिसरातील जेडीसीसी बॅक काॅलनीत रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास दाेन सख्ख्या भावांच्या कुटुंबामध्ये शाैचालयाच्या वादातून तुफान हाणामारी झाली. यात पाच काका, पुतणे जखमी झाले अाहेत. जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात परस्पर विराेधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जेडीसीसी बँक काॅलनीत शेख नईम शेख यासिन (वय ६२) यांच्या त्यांचे 6 भावंडांचे कुटुंब एकाच इमारतीत राहते. गेल्या वर्षभरापासून त्यांचे इजाज शेख यांच्या कुुटुंबासाेबत शाैचालयावरून वाद सुरू अाहे. रविवारी रात्री १० वाजता याच कारणावरून दाेन्ही कुटुंबीयांमध्ये वाद हाेऊन तुफान हाणामारी झाली. यात शेख नईम शेख यासीन (वय ६२), अश्पाक शेख नईम शेख (वय ३०), मुश्ताक शेख नईम शेख (वय ३५), नदीम शेख इजाज शेख (वय २४), इम्रान शेख इजाज शेख (वय २४) हे जखमी झाले अाहेत.

परस्पर विराेधी गुन्हेे
मारहाणप्रकरणी जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा परस्परविराेधी गुन्हे दाखल झाले अाहेत. यात शेख नईम शेख यासीन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नदीम शेख, इरफान शेख, इम्रान शेख, रिजवान शेख, अजिज शेख यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. तर शेख नदीम शेख एजाज शेख याने दिलेल्या फिर्यादीवरून मुश्ताक शेख, अश्फाक शेख, तन्वीर शेख यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
पुढे वाचा... ‘मूजे’त दोन विद्यार्थ्यांना मारहाण
... फलकाच्या वादातून ‘बीजे’त मारहाण