धुळे - शहरानजीक असलेल्या फागणे येथे मागील भांडण अाणि रविवारी धार्मिक कार्यक्रमात झालेल्या वादाचे पडसाद साेमवारी उमटले. यात दाेन्ही गटातील जमावाने एकमेकांना मारहाण केल्याने दुपारपासून तणाव निर्माण झाला. हाणामारीत तलवारीसारख्या तीक्ष्ण शस्त्रांचा वापर झाला. यात तीन जण जखमी झाले. त्यांच्यावर हिरे मेडिकल काॅलेज रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. दुपारनंतर सायंकाळीही पुन्हा तणाव निर्माण झाला. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक करण्यात अाली. त्यामुळे कडेकाेट पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात अाला.
संचारबंदीसारखी स्थिती निर्माण झाल्याने रस्त्यांवर शुकशुकाट हाेता. दुकाने बंद हाेती. रात्री उशिरापर्यंत पाेिलसांनी संशयितांना पकडण्यासाठी शाेधमाेहीम राबवली. यात काही जणांना ताब्यात घेण्यात अाले.
फागणे येथे काल रविवारी धार्मिक कार्यक्रम झाला. त्यासाठी संपूर्ण गावाला जेवणाचे निमंत्रण हाेते. या कार्यक्रमात गावातील दाेन गटात एकमेकांकडे पाहण्यावरून वाद झाला. मात्र नागरिकांनी मध्यस्थी करीत धार्मिक कार्यक्रमात गाेंधळ घालू नका, असे सांगत वाद िमटवला. मात्र, संबंधित दाेन्ही गटात गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरूच हाेती. रविवारच्या वादाने त्यात भर पडली. त्याचे पडसाद साेमवारी उमटले. पेट्राेल पंपाशेजारी असलेल्या शनी मंिदराजवळ काही तरुणांनी एकाला मारहाण केली. मारहाणीनंतर संबंधित तरुण पाेिलस अधीक्षकांकडे तक्रार देण्यासाठी अाले. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला. दुपारी शाळेतील एका समाजाच्या लहान मुलांनाही मारहाण झाल्याने वाद अधिक वाढला. याची दखल घेत पाेिलसांनी बंदाेबस्त ठेवला. सायंकाळी संदीप मोरे याला शनी मंिदरानजीक मारहाण झाल्यानंतर महामार्गालगत असलेल्या दुकानदारांनी पटापट दुकाने बंद केली. पाेिलसांनी शनी मंिदराकडे धाव घेऊन संदीप माेरेला तातडीने खासगी वाहनातून उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले. त्यानंतर महामार्गावर अाडवे टाकलेले दुचाकी वाहन बाजूला केले. मात्र दुकाने बंद झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. बंदाेबस्तासाठी अतिरिक्त पाेिलस कुमक मागवण्यात अाली. रात्री उशिरापर्यंत पाेिलस बंदाेबस्त ठेवण्यात अाला. तसेच संशयितांचा शाेध घेण्यासाठी पाेिलसांकडून शाेधमाेहीम राबवण्यात अाली. याप्रसंगी तालुका पाेिलस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पगारे, उपनिरीक्षक राजेंद्र मांडेकर, स्वप्निल काेळी यांच्यासह पाेिलस कर्मचारी अाणि कमांडाे पथकातील कर्मचारी बंदाेबस्त ठेवून अाहेत. शनी मंिदर परिसर अाणि एकलव्य नगरात रात्रीपर्यंत तणावाची स्थिती हाेती. पाेिलसांकडून कारवाई हाेण्याच्या शक्यतेने अनेकांनी दरवाजे बंद केले हाेते. तर काही जण पळून गेले.
वाहनांवर दगडफेकीचा प्रयत्न
सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास संदीप नामदेव माेरे याला मारहाण झाल्याच्या घटनेनंतर महामार्गावरून जाणाऱ्या काही वाहनांवर रस्त्यालगतच्या वस्तीतून दगडफेक करण्याचा प्रयत्न करण्यात अाला. मात्र, पाेिलसांनी तातडीने दगडफेक करणाऱ्यांना अटकाव केल्याने पुढील अनर्थ टळला. तसेच घटनेनंतर काेणत्याही प्रकारची वाहतूक काेंडी हाेणार नाही याची खबरदारी घेण्यात अाली.
एकाला पुन्हा मारहाण
सायंकाळी पाेलिस बंदाेबस्तासाठी एकलव्य नगरकडे गेले असताना शनी मंदिराजवळ पुन्हा संदीप माेरे याला काही जणांनी मारहाण केली. तसेच वाहनांचे नुकसान केले. त्याची खात्री करून घेण्यासाठी दुसरा जमाव शनी मंदिराकडे यायला लागल्याने तणाव अधिक वाढला.
गणेश स्थापनेपासून सुरू अाहे धुसफूस
फागण्यात गणेश स्थापनेच्या दिवशी मिरवणूक विशिष्ट गल्लीतून नेण्याच्या वादातून दाेन गटात दगडफेकीची घटना घडली हाेती. त्या वेळी एकाच गटाकडून पाेिलसांत तक्रार दाखल करण्यात अाली. त्यानंतरही एक, दाेन वेळा दाेन्ही गटात वाद निर्माण झाला. मात्र, ताे थाेडक्यात मिटला. काल रविवारी धार्मिक कार्यक्रमात जेवणाच्या पंगतीत झालेल्या वादातून जुन्या वादाला पुन्हा ताेंड फुटूून त्याचे पडसाद गावात उमटल्याचे दिसून अाले.