आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशाेक चव्हाणांसमाेरच कानाखाली वाजवली; कार्यकर्ते भिडले, रेटारेटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांच्यासमाेरच मंगळवारी काॅंग्रेस कार्यकर्त्यांचा तुफान राडा झाला. त्यातच गाेंदूरच्या एकाने कार्यकर्त्याच्या कानफटात लगावल्याने राड्याचे रूपांतर काॅलर पकडून हाणामारीत झाले. यात प्रचंड रेटारेटी झाली. एकच धक्काबुक्कीही झाली. यामुळे माेठा गाेंधळ उडाला. पाेलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने प्रकरण मिटले. मात्र, त्यानंतर तणाव कायम हाेता. गुलमाेहाेर विश्रामगृहात घडलेल्या या घटनेने सकाळच्या सुमारास एकच खळबळ उडवून दिली. याची पहिली ठिणगी उद्याेजक किशाेर पाटील यांच्या निवासस्थानी पडली. तिथे माजी मंत्री राेहिदास पाटील अामदार कुणाल पाटील यांना अशाेक चव्हाणांची भेट घेण्यापासून राेखण्यात अाले. त्याचेच पडसाद नंतर विश्रामगृहावर उमटले.

काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसमाेरच हा गाेंधळाचा प्रकार सुरू हाेता. मात्र, हतबलतेशिवाय अशाेक चव्हाण काहीच करू शकले नाहीत. मात्र, इतरांनी हस्तक्षेप करीत कार्यकर्त्यांना समजावले. याबाबत पाेलिसांत तक्रार अर्जही करण्यात अाला अाहे. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण हे मंगळवारी सकाळी शहरात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी प्रथम स्नेहनगरातील किशाेर पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. तिथे काॅंग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित हाेते. त्या वेळी अशाेक चव्हाण यांना भेटण्यासाठी माजी मंत्री राेहिदास पाटील, अामदार कुणाल पाटील अाले तेव्हा प्रफुल्ल रामराव पाटील यांनी राेहिदास पाटील यांना राेखले. अशाेक चव्हाण यांची भेट घेऊ द्यायला मज्जाव केला. या वेळी त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यांना बाजूला सारून राेहिदास पाटील हे चव्हाण यांच्या भेटीसाठी गेले. तिथून अशाेक चव्हाण हे संताेषीमाता चाैकातील शासकीय विश्रामगृहात अाले. तिथे युवराज करनकाळ, श्यामकांत सनेर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते हाेते. विश्रामगृहातही प्रफुल्ल पाटील अाणि इतर कार्यकर्त्यांमध्ये भेटी घेण्यावरून शाब्दिक वाद झाला. त्या वेळी प्रफुल्ल पाटील यांनी काॅंग्रेसचे नुकसान करणाऱ्यांबद्दल अपशब्द वापरले. या वेळी राजेंद्र भदाणे (गाेंदूर) यांनी प्रफुल्ल पाटील यांच्या कानशिलात लगावली. हा प्रकार अशाेक चव्हाण यांच्यासमाेरच झाल्याने एकच गाेंधळ उडाला. त्यानंतरही विश्रामगृहाच्या बाहेर अाल्यानंतर प्रफुल्ल पाटील यांना काॅंग्रेसच्या काही कार्यकर्त्यांकडून याच मुद्द्यावरून रेटारेटी करीत धक्काबुक्की केली गेली. हा गाेंधळ शासकीय विश्रामगृहात दहा ते पंधरा मिनिटे सुरू हाेता. गाेंधळ वाढत असल्याचे पाहून अशाेक चव्हाण यांनी इतर पदाधिकाऱ्यांचे स्वागत स्वीकारत तेथून निघून जाणे पसंत केले. प्रदेशाध्यक्षांसमाेर घडलेल्या या घटनेवर प्रदेशाध्यक्षांकडून काेणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात अाली नाही. प्रदेशाध्यक्षांसमाेर अाज घडलेल्या प्रकारामुळे अजूनही पक्षात गट-तट अाणि हेवेदावे सुरू असल्याचे दिसून येते. या प्रकाराची दिवसभर काॅंग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी अाणि सर्वसामान्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली हाेती. दिवसभर हाच विषय चर्चेचा हाेता.
काँग्रेसचा कार्यकर्ताच नाही
प्रफुल्ल पाटील हा काँग्रेसचा कार्यकर्ताच नाही. ताे विश्रामगृहात मद्यपान करून अाला हाेता. त्याच्याकडून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल अपशब्दांचा वापर केला जात हाेता. त्याला समजावण्याचा प्रयत्न करण्यात अाला. - युवराज करनकाळ, शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

प्रफुल्ल पाटलांचा अर्ज
प्रफुल्ल पाटील यांनी शहर पाेलिसात तक्रार अर्ज दिला. त्यात म्हटले की, अशाेक चव्हाण यांना भेटायला गेलाे हाेताे. त्या ठिकाणी राेहिदास पाटील, युवराज करनकाळ, श्यामकांत सनेर, प्रकाश भदाणे उपस्थित हाेते. तिथे विजय नवल पाटील यांच्याशी चर्चा करीत असताना प्रकाश भदाणे अन्य दाेन जणांनी वाद घातला. तसेच धक्काबुक्की केली. युवराज करनकाळ यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले अाहे. धक्काबुक्की करणाऱ्यांमध्ये कैलास गवळी, अशाेक सुडके, राजू पाटील, राजेंद्र भदाणे यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. पाेलिसांनी याबाबत तक्रार नाेंदविली आहे.
बातम्या आणखी आहेत...