आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘फिनाले’पूर्वी तनय उद्या जळगावात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - खासगी वाहिनीवरील डान्स प्लस स्पर्धेत प्रेक्षकांच्या वोटिंगमुळे अंतिम चार स्पर्धकांत पोहोचलेला तनय मल्हारा फिनाले पूर्वी जळगावकरांचे आशीर्वाद घेण्यासाठी बुधवारी जळगावला येत आहे. यानिमित्त त्याची रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीत ठिकठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येईल.

जळगावकरांनी भरभरून वोट केल्यामुळे त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच फिनालेत उत्तम कामगिरी व्हावी, म्हणून आशीर्वाद घेण्यासाठी तनय येत आहे. रेल्वेस्थानकावर तनयचे आगमन झाल्यानंतर सकाळी वाजता रॅलीस सुरुवात हाेईल. रॅली नेहरू पुतळामार्गे खान्देश सेंट्रल मॉलच्या आवारात जाईल. तेथे त्याचे स्वागत शहरातील लोकप्रतिनिधींच्या हस्ते होईल. तसेच सायंकाळी खान्देश मॉलच्या मैदानावर त्याचा ‘एक विशेष डान्स शो’ ठेवण्यात आला आहे.
असाअसेल रॅलीचा मार्ग :रॅली शिवाजी पुतळा चौक, स्टेडियम कॉम्प्लेक्स, स्वातंत्र्य चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, आकाशवाणी चौक, सागर पार्क, काव्यरत्नावली चौकमार्गे सेंट टेरेसा शाळेत समारोप होईल. रॅलीदरम्यान “सेल्फी विथ तनय, शेक हॅण्ड विथ तनय’ची संधी मिळणार आहे.
बातम्या आणखी आहेत...