आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Before The Resolution Corporation Fake Cotation Ready

पालिकेच्या ठरावापूर्वीच बनावट कोटेशन तयार!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - केंद्राच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटपासाठी 25 लाख रुपये खर्च केले जातात. या योजनेतून गणवेश उपलब्ध होत असताना त्या व्यतिरिक्त अजून दोन गणवेश देण्याचा घाट घातला जात आहे. शिक्षण मंडळाचा ठराव होण्यापूर्वीच कोटेशन घेण्यात आले. यासाठी लागणारा 35 लाखांचा खर्च पालिकेच्या माथी मारण्याच्या हालचाली सुरू आहेत.

शहरात 42 शाळा आहेत. या शाळांमध्ये शिकणार्‍या मुलांना एका वर्षात दोन गणवेश, एक जोडी बुट, सॉक्स तसेच ओळखपत्र देण्याचा ठराव शिक्षण मंडळाने केला आहे. हा ठराव 25 मार्च रोजी झालेल्या सभेत झाला असून यासाठी लागणार्‍या खर्चाचे कोटेशनही त्याच तारखेचे मागविण्यात आलेले आहे. सभेपूर्वीच कोटेशन तयार कसे झाले? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 35 लाख रुपये खर्चाच्या प्रकरणात सदस्यांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे प्रशासन अधिकारी, अभियान विभागाचे सहायक अधिकारी संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहेत.

बनावट कोटेशनची शिफारस
42 शाळेत सहा हजार 881 विद्यार्थी दाखवण्यात आले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला ओळखपत्र देण्यासाठी कुठलीही जाहिरात न काढता तीन कोटेशन जोडण्यात आले आहेत. एकाच छायाचित्रकाराने स्वत:च्या लेटरहेडवर एक खरे व दोन बनावट कोटेशन तयार करून सादर केले आहेत. इतर दोन फोटो स्टुडिओचे कोटेशन बनावट असल्याचे प्रथमदर्शनीच उघड होत असतानाही ते स्वीकृत करण्यात आले आहेत. यासाठी एक लाख तीन हजार 215 रुपये खर्च लागणार असून कोटेशन सोबत जोडल्याचे पत्र सभापती विजय वाणी यांनी महापौरांच्या नावे दिले आहे.
गणवेश, ओळखपत्र, बुट खरेदीसाठी सभापतींनी फोन करून दरपत्रक मागवले. या प्रकरणाशी माझा संबंध नाही. सभापतींनी परस्पर फोन लावून कोटेशन मागविले असावे. खर्चाचा अंदाज येण्यासाठी कच्चे कोटेशन घेतले आहे. निधी मिळाला तर पुढील कारवाई होईल. अशोक फेगडे, प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ
दरासाठी एकच कोटेशन
प्रीमियम प्रकारातील गणवेश घेतल्यास 26 लाख 81 हजार 296 रुपये खर्च तर एक्सलंट प्रकारात 28 लाख 44 हजार 88 रुपये खर्च लागणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. मंडळाची सभा झाली त्याच दिवशी सभापतींच्या नावे भुसावळ रिगल गारमेंटच्या नावाने कोटेशन मागवून किंमत ठरवली आहे.