आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेलगंगा कारखान्याची 39 काेटींत विक्री, चाळीसगावातील राजकीय समीकरण बदलणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - चाळीसगावच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेल्या बेलगंगा सहकारी साखर कारखान्याची विक्री करण्यात जिल्हा बँकेला यश अाले अाहे. गृहराज्यमंत्री डाॅ. रणजित पाटील यांचे शालक चित्रसेन पाटील यांनी ३९ काेटी २२ लाख रुपयांना हा कारखाना खरेदी केला अाहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून कारखाना विक्री करत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी तालुक्याच्या राजकीय समीकरणाला कलाटणी दिल्याचे मानले जात अाहे. खासदार ए. टी. पाटील यांचे दत्तक गाव असलेल्या भाेरस येथे हा कारखाना असून अामदार उन्मेष पाटील यांच्या राजकीय लाँचिंगमध्ये कारखान्याची भूमिका महत्त्वाची हाेती. 

जिल्हा मध्यवर्ती बँकेने यापूर्वी बेलगंगा कारखाना विक्री करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी अामदार उन्मेष पाटील यांनी तालुक्यात रॅली काढून जिल्हा बँकेवर माेर्चा काढला हाेता. कारखाना विक्री करण्याएेवजी सुरू करा, या त्यांच्या मागणीने तालुक्याचे राजकीय समीकरण बदलले हाेते. विधानसभा निवडणुकीत अामदार पाटील यांना त्याचा लाभही झाला. खासदार ए. टी. पाटील यांनी कारखाना असलेले भाेरस हे गाव पंतप्रधान दत्तक ग्राम याेजनेत दत्तक घेऊन कारखाना सुरू करण्याचा नारा दिला हाेता. दरम्यान, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जिल्हा बँकेची अार्थिक स्थिती सुधारण्यासाठी कारखाना विक्रीचा निर्णय घेतला हाेता. शासनाची एजन्सी असलेल्या एमएसटीसीमार्फत ३९.२२ काेटी रुपयांना कारखान्याची लिलावात विक्री करण्यात अाली अाहे. 

अामदार उन्मेष पाटील यांना फटका 
कारखानाविक्री करण्यास विराेध केल्यापासून अामदार उन्मेष पाटील हे राजकीय प्रकाश झाेतामध्ये अाले हाेते. राज्यात अाणि जिल्हा बँकेतदेखील भाजपची सत्ता असताना अाता कारखाना विक्री झाला अाहे. गृहराज्यमंत्री डाॅ. रणजीत पाटील यांच्या शालकांनीच हा कारखाना खरेदी केला असून माजी मंत्री खडसेंच्या माध्यमातून जिल्हा बँकेने हा निर्णय घेतला अाहे. त्यामुळे कारखाना विक्रीच्या निर्णयातून अामदार पाटील यांना राजकीय फटका बसल्याचे बाेलले जात अाहे. 

एमएसटीसीकडून विक्री 
केंद्रशासनाच्या अधिपत्याखाली एमएसटीसी या एजन्सीकडून कारखान्याची ३९.२२ काेटी रुपयांना विक्री झाली अाहे. १० टक्के अागाऊ रक्कम भरून चाळीसगाव येथीलच अंबाजी ट्रेडिंग कंपनीने हा कारखाना खरेदी केला अाहे. कारखान्याची मूळ किंमत ३९.२० काेटी रुपये हाेती. जिल्हा बँकेने कारखान्याला २४ काेटी रुपयांचे कर्ज दिले हाेते. व्यासासह अाज राेजी ७१ काेटी ३८ लाख रुपये कारखान्याकडे घेणे अाहेत. भविष्यनिर्वाह निधी, विक्रीकर अाणि कामगारांची अशी इतर ५० काेटींची देणी कारखान्यावर अाहे. सद्य:स्थितीत बंद असलेल्या कारखान्याकडे ७५ हेक्टर जमीन उपलब्ध अाहे. 

शेतकऱ्यांना करायचे अाहे मालक 
कारखानाभांडवलदारांनी नव्हे, तर ऊस उत्पादकांनी एकत्रित येऊन विकत घेतला अाहे. यात सर्व शेतकरी भागभांडवल देऊन सहभागी हाेतील. सहकारी एेवजी कंपनी म्हणून काम करत १० ते २० मित्रांनी एकत्रित येऊन टेंडरसाठी लागणारे काेटी रुपये भरले अाहेत. अाता शेतकऱ्यांकडून पैसे जमा करून उर्वरित रक्कम उभी करू. लिलावाचा पहिला टप्पा पूर्ण केला, अाता निर्णय बँकेच्या हाती अाहे.- चित्रसेन पाटील, संचालक,अंबाजी ट्रेडिंग कंपनी. 

बँकेचा एनपीए घटणार 
जिल्हाबँकेने बेलगंगा विक्रीसाठी शासनाच्या एमएसटीसी लिमिटेड या एजन्सी मार्फत अाॅनलाइन लिलाव करून प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली अाहे. काेणत्याही वादाशिवाय बंॅकेची मालमत्ता विक्री करण्यास पहिल्यांदाच यश अाले अाहे. या पूर्वीच्या लिलाव प्रक्रिया राजकीय हस्तक्षेप अाणि वादामुळे फाेल ठरल्या हाेत्या. या व्यवहारामुळे जिल्हा बँकेचा एनपीए कमी हाेण्यास मदत हाेणार अाहे. बंॅकेच्या बैठकीत विक्रीच्या पुढील प्रक्रियेला मंजुरी दिली जाणार अाहे.