आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखमाेलाचे पुरस्कार विद्यार्थिनींच्या कलात्मकतेला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महाविद्यालयातवर्षभर होणाऱ्या विविध उपक्रमांमधून समाजप्रबोधन, स्त्री-पुरुष समानता, लेक वाचवा असे संदेश दिले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या या कलात्मकतेला वाव मिळावा म्हणून राज्य शासनाने गेल्या वर्षी जागर जाणिवांचा अभियान राबवले. यात बेंडाळे महिला महाविद्यालयाला विद्यापीठ आणि जिल्हा पातळीवरील प्रथम क्रमांकाचे दोन बक्षीस मिळाले. त्यांना बक्षिसापोटी लाख रुपये मिळाले आहेत.
बेंडाळे महाविद्यालयात वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभे रहावे, या उद्देशाने महाविद्यालयात हस्तकला प्रदर्शनी घेतली गेली. तसेच ब्युटी थेरपी हेअर ड्रेसिंग, सॉफ्ट टॉइज मेकिंग, लेडीज टेलर, फिनाइल एलईडी लॅम्प मेकिंग, कुकिंग बेकिंग वर्कशॉप, ऐश्वर्या सेल्स काउंटर हे उपक्रम यशस्वीपणे राबवले गेले. तसेच महािवद्यालयातच सुरू केलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्रामुळेही विद्यार्थ्यांना फायदा होतो आहे. यामुळे पुरस्कारासाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे गुण प्राप्त झाले. स्त्री सक्षमीकरणासाठी उपक्रम फायदेशीर ठरत आहेत.
या पॅरामीटरवर मिळाले पुरस्कार
शासनानेमहाविद्यालय तसेच विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, संशोधन आणि सातत्य या तीन गोष्टींवर भर दिला हाेता. वर्षभरात होणाऱ्या उपक्रमातून समाजासाठी काय संदेश जातो, याचा अभ्यास केला गेला. राज्यभरातील शेकडो महाविद्यालयांनी या अभियानात सहभागी होत अहवाल पाठवले होते. बेंडाळे महाविद्यालयात विद्यापीठ स्तरावरील प्रथम क्रमांकासाठी लाख तर जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकासाठी लाख असे एकूण लाख रुपये प्राप्त झाले आहेत. महािवद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एस.राणे यांनी २० ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात उच्च तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्याहस्ते पुरस्कार स्वीकारला.