आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील बेस्ट महिला फार्मासिस्टची घाेषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - केवळ नावाला फार्मासिस्ट राहता अाैषध विक्रीच्या दुकानाच्या चाव्या हाता ठेवून संपूर्ण व्यवहार हाताळणाऱ्या जिल्ह्यातील पाच महिला फार्मासिस्टची पुरस्कारासाठी निवड करण्यात अाली अाहे. जिल्हा केमिस्ट असाेसिएशनच्या कमिटीने जिल्हाभरातील महिला फार्मासिस्टमधून ही निवड केली असून अाचारसंहिता संपल्यानंतर पुरस्कार वितरण कार्यक्रम हाेईल.
जळगाव जिल्हा मेडिसीन डिलर्स असाेसिएशनतर्फे गेल्या महिन्यात २६ सप्टेंबर राेजी जागतिक फार्मासिस्ट दिवस साजरा करण्यात अाला. या वेळी जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे अायाेजन करण्यात अाले हाेते. अाज सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बराेबरीने अाघाडीवर अाहेत. अाैषधी व्यवसायातही काही महिला फार्मासिस्ट अापला परिवार सांभाळून काही वर्षांपासून अाैषधी व्यवसाय यशस्वीपणे सांभाळत अाहेत. या अनुषंगाने जागतिक फार्मासिस्ट दिवसाचे अाैचित्य साधून जिल्हा संघटनेतर्फे महिला फार्मासिस्टचा त्यांच्या कार्याचा गाैरव करण्याचा निर्णय घेतला हाेता.

...यांना मिळणार पुरस्कार
कमिटीने फैजपूर (ता. यावल) येथील धनश्री मेडिकलच्या संचालिका जयश्री सराेदे, एरंडाेल येथील चेतना मेडिकलच्या संचालिका मीना पवार, चाळीसगाव येथील श्री मंगलमूर्ती मेडिकलच्या संचालिका पुष्पा चाैधरी, जळगाव येथील शुभम मेडिकलच्या संचालिका अर्चना पाटील, अायुषी मेडिकलच्या संचालिका वर्षा महाजन या महिला फार्मासिस्टची ‘बेस्ट महिला फार्मासिस्ट अवाॅर्ड’साठी निवड झाली अाहे.

निवडीसाठी हे हाेते निकष
जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या नेतृत्वात महिला फार्मासिस्टचा सन्मान करण्याच्या दृष्टीने कमिटी तयार करण्यात अाली. यात कमिटी प्रमुख म्हणून चाळीसगाव येथील संदीप बेदमुथा यांची नियुक्ती करण्यात अाली. कमिटीने जिल्हाभरातील महिला फार्मासिस्टची माहिती गाेळा केली. यात ज्या महिला अाैषध विक्रीच्या दुकानाची संपूर्ण जबाबदारी पार पाडतात. सकाळी दुकान उघडण्यापासून ते बंद हाेईपर्यंत व्यवहार हाताळतात. अाैषधींच्या मागणी पुरवठ्यावर संंपूर्ण लक्ष घालतात. केवळ नावाला फार्मासिस्ट राहता दैनंदिन कामात अापला वेळ घालवतात असे निकष पूर्ण करणाऱ्या महिलांची पुरस्कारासाठी निवड करण्याचा निर्णय घेण्यात अाला.


बातम्या आणखी आहेत...