आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भडगाव तालुक्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दीड लाखासह 30 जणांवर कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भडगाव- तालुक्यातील कजगाव व वाक येथे पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर छापा टाकला. त्यात कजगावला 16 तर वाक येथे 14 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला, असल्याची माहिती मिळाली आहे.

कजगाव ( ता. भडगाव) येथे काल सायकांळी पाच वाजता राहूल खानावळच्या मागील बाजुस सार्वजनिक जागी अप्पर पोलिस अधिक्षक यांच्या कार्यालयातील पथकाने गुप्त माहीतीच्या आधारे अचानक छापा टाकला. त्यात एक लाख 43 हजार 350 रूपये रोख व पत्ता जुगाराचे साहीत्य आढळून आले. तर 16 जणानी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात राजेंद्र मिस्तरी, सुरेश वाणी (रा.आडळसे), कपुरचंद पाटील (रा.पिंप्री), देविदास महाजन (रा. वाडे), भिकन महाजन, श्रावण राठोड, जितेंद्र टाटीया, राजेंद्र चव्हाण, संतोष खोमणे, अशपाक शहा, नितीन अमृतकार, मुजाम्मिल शहा, अंतिमकुमार धाडीवाल, दिलीप जैन (सर्व रा. कजगाव), प्रदीप राजपुत (रा.सावदे), जालम उर्फ दिलीप पाटील (रा.दलवाडे), यांच्यावर मुंबई जुगार अॅक्ट कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाक येथे भडगाव काल (गुरुवारी) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास गावाजवळ रस्त्याच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेत पत्ते खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अचानक छापा टाकून पत्ते खेळणार्‍या 14 जणांना ताब्यात घेतले. यात राजु पाटील, विशाल पाटील, प्रभाकर पाटील, समाधान पाटील, सागर पाटील, डीगबंर पाटील, गोपाल पाटील, संदिप पाटील, परेश पाटील, सर्जेराव पाटील, मनोज बोरसे, सुभाष पाटील, प्रभाकर पाटील, कैलास पाटील (सर्व रा.वाक) येथे यांचा समावेश होता. संबंधितावर भडगाव पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथे 9 हजार 60 रूपये रोख व पत्ता जुगाराचे साहीत्य मिळून आले. दोघे घटनेतील संबधिताना ताब्यात घेतल्यानंतर सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगीतले.

पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र निकुंभ व पोहेका भागवत पाटील हे तपास करत आहे. या छाप्या बाबत पोलिसांचे कौतुक होत असले तरी ग्रामीण भागातच कारवाई होत असून भाडगाव शहरात मात्र कारवाई कडे पोलीस विभाग दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
बातम्या आणखी आहेत...