आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भडगाव: शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीच करताहेत शाळेची रंगरंगाेटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भडगाव- अध्ययन प्रकिया जरी विद्यार्थी केंद्रीत असली तरी शिक्षणाच्या या यज्ञकुंडात शिक्षक पालकाची भूमिका महत्वाची असते. हाच अादर्श डाेळ्यासमाेर ठेऊन तालुक्यातील खेडगाव खुर्द येथील दादासाे ब.शि.हिरे सर्वाेदय माध्यमिक विद्यालयाचा चेहरा माेहरा बदललाय. लाेकवर्गणीतून ही शाळा स्मार्ट शाळा ठरली. शाळेची वाटचाल डिजीटल शाळेकडे हाेतेय. विशेष म्हणजे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीच स्वत:च्या हाताने शाळेला रंग मारताय. 
 
हल्लीच्या काळात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची मराठी माध्यमाच्या सरकारी शाळांची तुलना करताना सरकारी शिक्षकांच्या कामकाजावर ताशेरे अाेढले जातात. दुसरीकडे मात्र खेडगाव खुर्द येथील शाळा शिक्षकांनी मुख्याध्यापकांच्या प्रेरणेने लाेगवर्णणी जमा करून शाळेला स्वत: रंगरंगाेटी केली. हिरे माध्यमिक विद्यालय पंचक्राेेषीतील अादर्श शाळा अाहे. विद्यार्थी गुणवत्तेकडे शाळेचे विशेेष लक्ष असते. विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविल्याने विद्यार्थ्यांचा लाैकीक वाढताेय. मात्र दुसरीकडे शाळा इमारतीची दुर्दशा झाली हाेती. त्यामुळे शिक्षकांनी वर्गणी जमा केली. अावश्यक त्या ठिकाणी दुरूस्ती शाळा इमारत, वर्ग खाेल्यांना रंगरंगाेटी करण्याचे काम सुरू करण्यात अाले अाहे. संस्थेचे चेअरमन उदेसिंग पवार, व्हाईस चेअरमन विकास पाटील, सचिव डी.डी.पाटील, शालेय समिती चेअरमन रघुवीर हिरे यांनी मुख्याध्यापक, शिक्षक कर्मचाऱ्यांचे या कार्याबद्दल काैतुक केले अाहे. ग्रामस्थांशिवाय शिक्षकांनी लाेकवर्गणीसाठी याेगदान दिले. त्यामुळे या शाळेतील शिक्षकांच्या कार्याचा अादर्श इतर शाळांनीही घ्यायला हवा. 
 
पेंटरला देण्याचे पैसे शाळा डीजीटलसाठी 
शाळेला रंगकाम करण्यासाठी पेंटरने ३५ हजाराचे बजेट दिले. परंतू शिक्षकांनी या कामासाठी २५ हजार रुपये गाेेळा केले हाेते. त्यात पेंटर २५ हजारात काम करण्यास तयार नव्हता. त्यामुळे २५ किंवा ३५ हजार रूपये पेेंटरला देण्यापेक्षा अापणच रंग अाणून ताे शाळेला मारला तर २० हजार रूपये पेंटरला देण्याची मजुरी वाचेल. अन् या बचत झालेल्या पैशातून शाळा डीजीटलचे काम सुरू करता येईल, असा विचार पुढे अाला. 
 
शाळेच्या रंगकामात व्यस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी. या शाळेतील शिक्षकांचे या उपक्रमाबद्दल काैतुक हाेत अाहे. बाहेर बेकारी असताना अापणास मिळालेल्या सरकारी नाेकरीचा फायदा विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे करून देण्यराचा निश्चय शिक्षकांनी केलाय. 
 
 
बातम्या आणखी आहेत...