आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती-पत्नीसह दोन लहानग्यांच्या खूनाचा होईना उलगडा, कोर्टाने दिली नार्कोटेस्टची परवानगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - भादली गावातील भोळे वाड्यात २० मार्च राेजी समाजमन सुन्न करणारी दुर्दैवी घटना घडली. भोळे कुटुंबातील पती, पत्नीसह दोन मुलांचा रविवारी मध्यरात्री निर्घृण खुन करण्यात अाला हाेता. दीड महिना उलटूनही या हत्याकांडाचा तपास लागला नाही. त्यामुळे खऱ्या मारेकऱ्यांच्या तपासासाठी पाेलिसांतर्फे गावातील काही जणांची ‘नार्काेटेस्ट’ करण्याची न्यायालयाकडे परवानगी मागितली हाेती. साेमवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. डी. गाेरे यांनी ७ जणांच्या नार्काे टेस्ट करण्याची परवागी दिली अाहे. त्यासाठी या सातही जणांना मंगळवारी न्यायालयात हजर राहण्याचे अादेश दिले अाहेत. 
 
भादली येथील प्रदीप सुरेश भोळे (वय ४५), पत्नी संगीता सुरेश भोळे (वय ३५), मुलगी दिव्या प्रदीप भोळे (वय ८), तर मुलगा चेतन प्रदीप भोळे (वय ५) यांची २० मार्च राेजी निर्घृण हत्या करण्यात अाली हाेती. या घटनेला दीड महिना उलटला तरी पाेलिसांच्या हाती काहीच लागले नाही. वेगवेगळ्या पद्धतीने तपास केला. मात्र त्यातही अपयश अाले. या प्रकरणी संशयीत किंवा हत्याकांडात वापरलेले हत्यारेही पाेलिसांच्या हाती लागली नाहीत. परराज्यात, अाजुबाजुच्या जिल्ह्यांमध्ये पथके पाठविली. मात्र तरीही पाेलिसांच्या हाती निराशाच पडली.   
 
नार्काे टेस्टची मागणी...
या गुन्ह्यात तपास हाेणे गरजेचे अाहे. पाेलिसांसाठी हा गुन्हा अाव्हानात्मक ठरला अाहे. या प्रकरणात नशिराबाद पाेलिसांनी एकूण ६३ जणांचे जबाब घेतले अाहेत. त्यातील काही साक्षीदारांनी दिलेले जबाब संशयास्पद अाहेत. त्यामुळे त्यांची पाॅलीग्राफ, ब्रेन मॅपींग, नार्काेटेस्ट करण्याची मागणी सरकारपक्षातर्फे करण्यात अाली अाहे.
बातम्या आणखी आहेत...