भालाेद : यावल तालुक्यातील भालाेद येथील कला, विज्ञान महाविद्यालयाच्या दाेन दिवसीय ‘आविष्कार’ वार्षिक स्नेहसंमेलनाचे पारिताेषिक वितरण शनिवारी हाेणार अाहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डाॅ. पी. पी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार अाहे.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता सेकंडरी एज्युकेशन साेसायटीचे माजी अध्यक्ष चंद्रकांत जगन्नाथ चाैधरी यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे चेअरमन दिलीप हरी चाैधरी यांच्या हस्ते हाेईल. दाेन दिवस चालणाऱ्या या स्नेहसंमेलनात सांस्कृतिक कार्यक्रम, प्रश्नमंजूषा, फनफेअर, रांगाेळी स्पर्धा, शेलापागाेटे असे कार्यक्रम हाेतील.
पारिताेषिक वितरण शनिवारी दुपारी वाजता कुलगुरू डाॅ. पी. पी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगकर्मी शंभू पाटील यांच्या हस्ते हाेईल. अध्यक्षस्थानी सेकंडरी एज्युकेशन साेसायटीचे अध्यक्ष अामदार हरिभाऊ जावळे असतील. याच कार्यक्रमात कुलगुरूंचा सत्कार संस्थेतर्फे करण्यात येणार अाहे.
कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली अाहे, असे उपप्राचार्य प्रा. मुकेश चाैधरी, स्नेहसंमेलन समिती प्रमुख प्रा. डी. बी. चाैधरी यांनी दिली. प्राचार्य डाॅ. ए. एस. काेल्हे यांचे मार्गदर्शन लाभत अाहे.
विद्यार्थी प्रतिनिधी नीलेश काेनी, वृषाली चाैधरी यांच्यासह प्राध्यापक आदी परिश्रम घेत अाहेत. दरम्यान, या कार्यक्रमाची जय्यत तयारी झालेली आहे, असे सांगण्यात अाले आहे. यात विविध कलागुण सादर केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येईल, असे स्नेहसंमेलनाचे महाविद्यालयातील सम्नवयांनी कळवले आहे.