आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भार्गवी चिरमुले होणार खान्देशची सूनबाई

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - फैजपूर येथे धनाजी नाना महाविद्यालयात युवारंग महोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी आलेली सिनेअभिनेत्री भार्गवी चिरमुले खान्देशची सूनबाई होणार आहे. या कार्यक्रमातच हा खुलासा झाला. भुसावळ येथील डॉ.प्रकाश एकबोटे यांचे चिरंजीव पंकज हे पुण्यात व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत. त्यांच्याशी भार्गवी विवाहबद्ध होणार आहेत. एकापेक्षा एक ही नृत्य स्पर्धा जिंकल्यानंतर भार्गवी चिरमुले हे नाव ख-या अर्थाने लाइम लाइटमध्ये आले. वहिनीसाहेब या मालिकेमुळे भार्गवी घराघरात पोहचली. मी ज्या शहरात जाणार आहे, तिथे काय चांगलं मिळतं, हे मी पहिल्यांदा शोधते असे सांगणा-या भार्गवीने खान्देशातील भरिताबद्दल आयोजकांशी खुलून चर्चा केली. कॉटन आणि सिल्कच्या प्रेमात असलेली भार्गवी वर्क केलेल्या कॉन्ट्रास्ट पंजाबी ड्रेसमध्ये खुलून दिसत होती.