आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडांची साल काढल्याने पाेलिस ठाण्यात तक्रार, भारती पर्यावरण प्रतिष्ठानतर्फे कारवाईची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - झाडांच्या बुंध्यांची साल काढून नंतर ते काेरडे झाल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्याचे प्रकार मेहरूण तलाव परिसरात सुरू अाहे. याप्रकरणी भारती पर्यावरण प्रतिष्ठानतर्फे एमआयडीसी पोलिसांकडे लेखी तक्रार देण्यात आली असून संबधितावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली अाहे. 
 
गेल्या काही महिन्यांपासून मेहरूण तलाव परिसरातील अनेक झाडे गहाळ झाली आहेत. लाकूडचाेर सुरुवातीला झाडाच्या बुंध्यांची साल काढतात. त्यामुळे काही दिवसांत झाड कोरडे होऊन पडण्यावर येते. तेव्हा चाेरटे रात्रीच्या वेळी झाडाची विल्हेवाट लावतात. या संदर्भात भारती पर्यावरण प्रतिष्ठानने एमआयडीसी पोलिस ठाणे, जिल्हाधिकारी आयुक्तांकडे लेखी तक्रार दिली अाहे. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याचे प्रतिष्ठानच्या सुजाता देशमुख यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. जुलै २०१७ रोजी प्रशासनातर्फे तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले होते. कालांतराने या रोपांच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या जाळ्यादेखील चोरी झाल्या. तसेच पाण्याअभावी अनेक सुकले असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. 
 
पक्षी झालेत गायब 
तलाव परिसरात मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढला असून दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ दिवसभर असते. त्यामुळे येथील पक्ष्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. जळगाव शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या भागाचा ऱ्हास होत असल्याचे हे संकेत आहेत. 
 
ड्रेनेजचे पाणी साेडण्यात येते थेट तलावात 
एकीकडेमेहरूण तलाव सुशोभिकरणासाठी पालिका खर्च करते, तर दुसरीकडे आदर्शनगर, शिरसोली रोड परिसरातील काही इमारतींचे ड्रेनेजचे पाणी थेट मेहरूण तलावात सोडण्यात आले आहे. त्यामुळे तलावातले पाणीदेखील दूषित होत आहे. या शिवाय मेहरूण भागातील अनेक नागरिक येथे दुचाकी, चारचाकी वाहने धुतात, तलावात म्हशींना अंघोळ घातली जाते. हे सर्व प्रकार थांबवून या परिसरात नैसर्गिक सौंदर्य वाढवण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी देखील प्रतिष्ठानने केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...