आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या रथावर स्वार सर्वांचीच आडनावे ‘भारतीय’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - देशाच्याघटनेची माहिती असणे हे प्रत्येक भारतीयाचा हक्क असून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे प्रत्येक घरातील नागरिकांपर्यंत पोहचवणारा ‘भारतीय संविधान रथ’ शनिवारी जळगावात दाखल झाला . ‘संविधान बचाअाे, देश बचाअाे’, ‘भारतीय संविधान पढाअाे, देश काे अागे बढाअाे अाैर एक भारत श्रेष्ठ बनाअाे’ हा नारा देत ‘व्हीजन अाॅफ बाबासाहेब वेल्फेअर असाेसिएशन’तर्फे ‘भारतीय संविधान रथ ’यात्रेस सुरवात केली अाहे. प्रत्येक राज्य, जिल्हा, प्रदेश, गावपातळीपर्यंत अगदी देशाच्या कानाकोपऱ्यात हा रथ जाणार असून काेणत्याही पक्ष, जात, धर्म यांचा हा रथ नाहीये. सामाजिक संघटनेतर्फे लोकसहभागाने या यात्रेचे अायाेजन केले असल्याचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एडविन भारतीय यांनी ‘दिव्य मराठी’ शी बाेलताना सांगितले. जळगावातील अनेक तालुक्यांमध्ये संविधानविषयक जनजागृती या माध्यमातून करण्यात अाली असून तीन दिवस जळगाव शहरातील विविध भागात याबद्दल माहिती दिली जाणार अाहे. 
 
१५० पदाधिकाऱ्यांचे आडनाव ‘भारतीय’ : व्हिजनअाॅफ बाबासाहेब वेल्फेअर असाेसिएशनमध्ये १५० सदस्य असून त्यापैकी काही पदाधिकारी यात्रेत सहभागी अाहे. याप्रकारचे अजून रथ तयार हाेत अाहे. विशेष बाब म्हणजे या १५० सदस्यांनी अापले मूळ अाडनाव काढून टाकले असून ‘भारतीय’ हे अाडनाव ते लावतात. त्यांच्यासाेबत सचिव सुशीला भारतीय, काेषाध्यक्ष कार्ल भारतीय देखील यात अाहे. 

संविधानास ‘धर्मग्रंथ’ म्हणून अाम्ही मानताे, ही चळवळ असून राजकारण नाही तर ‘राष्ट्रनीती ’असल्याचेही एडविन यांनी सांगितले. शहरात राष्ट्रीय दलित पॅथरचे अध्यक्ष राजू महाळे, भीमराव साेनवणे, भगवान साेनवणे यांनी संविधान रथ यात्रेचे स्वागत केले. 
संविधान रथाबरोबर देशभर भ्रमंती करणारे ‘भारतीय’. 

सात वर्ष चालणार यात्रा 
रथयात्रेचीसुरुवात १४ एप्रिल २० १७ पासून डाॅ. बाबासाहेब अांबेडकरांचे जन्मस्थळ महू (मध्य प्रदेश ) येथून करण्यात अाली. तब्बल वर्ष ही यात्रा भारतात फिरणार अाहे. संविधानाच्या ३० कोटी काॅपी या रथयात्रेदरम्यान वाटप करण्याचेही त्यांचे उद्दिष्ट अाहे. या यात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळत अाहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह रथात चार इतर जण अाहेत. त्याचप्रमाणे सॅटेलाइट कनेक्टेड अाहे. जीपीअारएस, सीसीटीव्ही लावलेले अाहे. तर बाबासाहेबांचे चित्र, संविधानातील अक्षरे रथावर अाहेत. त्याचप्रमाणे प्राेजेक्टरद्वारे बाबासाहेबांच्या कार्याचा उजाळा दिला जाताे. तर वायफाय सुविधाही या रथामध्ये अाहे. 
बातम्या आणखी आहेत...