आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhawsar Family Safe Return From Uttrakhand Flood

सैन्याच्या हेलिकॉप्टरने वाचले भावसार कुटुंब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - उत्तराखंडच्या जलप्रकोपात पाच दिवस अडकून पडलेल्या भिकमचंद जैननगरातील भावसार कुटुंबाला सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचा सहारा मिळाला आणि ते मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडले. रविवारी जळगावात परतल्यानंतर पाच दिवसातील अनुभव कथन करताना या कुटुंबाच्या अंगावर शहारे उभे राहत होते. जळगाव रेल्वेस्थानकावर नातेवाइकांना पाहताच निसर्गाच्या प्रकोप अनुभवणार्‍या या भाविकांना अर्शूंचा बांध आवरता आला नाही.

केदारनाथ मंदिराजवळ अडकून पडल्यामुळे पाच दिवस अन्नाशिवाय काढावे लागले. पुराचे पाणी पिऊन, मिळेल त्या जागेचा आडोसा घेतला. पाण्याबरोबर वाहून आलेले मृतदेह समोरच पडले होते. अशा भयावह आणि विदारक परिस्थितीमुळे जीव वाचण्याची आशाच मावळली होती. उत्तराखंडातील प्रयलयात अडकलेले अनेक जण गावाकडे सुखरूप परतले. त्यांच्या चेहर्‍यांवरील परतीचा आनंद शब्दात वर्णन करण्यापलिकडे आहे.

अन्नाशिवाय काढले पाच दिवस
केदारनाथला मुक्कामी असताना पुराचा मोठा लोंढा आला अन् समोरील दुकाने, घरे विळख्यात घेऊन गेला. आम्ही राहत असलेल्या घरालगत मोठा दगड अडकून पडल्याने पाण्याच्या प्रवाहाचा मार्ग बदलल्यामुळे आमचा जीव वाचला. ज्योती/दीपक भावसार