आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागितले अाशीर्वाद, मिळाली तासाभरात १२३ रुपये भिक , मनपासमाेर गाळेधारकांचे अभिनव अांदाेलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - कर्जफेडीसाठीगाळेधारकांना वेठीस धरले जात असून या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी अाशीर्वादाचे भीक मांगाे अांदाेलन करण्यात अाले. मात्र, अाशीर्वाद मिळण्याएेवजी येणाऱ्या जाणाऱ्यांनी कटाेऱ्यात पैसे टाकल्याने तासाभरात १२३ रुपये जमा झाले. विशेष महासभेचे औचित्‍य साधून पािलकेच्या प्रवेशद्वाराजवळ जुने भिकमचंद जैन मार्केटमधील गाळेधारकांनी बुधवारी सकाळी हे अांदाेलन केले.
कर्जफेड कशी करावी, यासंदर्भात धाेरण ठरवण्यासाठी बुधवारी विशेष सभा झाली. या सभेला येणाऱ्या नगरसेवकांनी व्यापाऱ्यांना अडचणीतून बाहेर येण्यासाठी अाशीर्वाद द्यावे, यासाठी अॅड. दशराज काेल्हे यांच्यासह काही गाळेधारकांनी हातात कटाेरे घेत अांदाेलन केले. अांदाेलनाच्या माध्यमातून जमा झालेली रक्कम प्रशासनाला देण्याचा प्रयत्न गाळेधारकांनी केला. मात्र, ही रक्कम प्रशासनाने स्वीकारल्याने यात अजून काही पैसे टाकून मुख्यमंत्री निधीसाठी ही रक्कम देणार असल्याचे अांदाेलकांनी स्पष्ट केले.

महापािलका परिसरात बुधवारी जुने भिकमचंद जैन मार्केटमधील गाळेधारकांनी दिवसभर अाशीर्वादाचे भीक मांगाे अांदाेलन केले