आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BHR Scam: It Takes Follow Up Of Property Recovery

बीएचअार घाेटाळा; मालमत्ता जप्तीसाठी करणार पाठपुरावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बीएचअार ठेवीदारांच्या राज्य संयुक्त समन्वय समितीची रविवारी गाेलाणी मार्केटमधील कार्यालयात बैठक घेण्यात अाली. त्यात पतसंस्थेतील ठेवीदारांची रक्कम परत करता केलेल्या घाेटाळ्यातील संशयितांवर वैयक्तीक गुन्हे दाखल करून त्यांची मालमत्ता जप्त करण्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात अाला.

या वेळी समितीचे अध्यक्ष विवेक ठाकरे, अॅड. हरूल देवरे, शिवराम चाैधरी अादींनी उपस्थित ठेवीदारांना मार्गदर्शन केले. पतसंस्थेचे अध्यक्ष प्रमाेद रायसाेनी सर्व संचालक यांच्या व्यक्तिगत तसेच व्यावसाियक गुंतवणूकीत सामाविष्ट इतर जंगम स्थावर मालमत्ता एमपीएअाडी कायद्यानुसार जप्त करणे विक्री करून ठेवीदारांचे पैसे तत्काळ मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय बैठकीत रविवारी घेतला. रामानंदनगर पाेलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या दाेषाराेपपत्राच्या अाधारे गुन्ह्यात सहभागी असणा-यांच्या मालमत्तांची माहिती देणारा प्रस्ताव जिल्हाधिका-यांना देणार असल्याचे, बैठकीत ठाकरे यांनी सांगितले. अटकपूर्व जामिनासंदर्भात त्रयस्त अर्जदार म्हणून ठाकरे अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेण्यात अाला.या वेळी दिलीप चाैधरी,भिका पाटील, एस. एम. पाटील, संध्या राणे, अर्चना कविश्वर अादी उपस्थित हाेते.