आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसर्व्हर, रेकॉर्ड रूमची अवसायक आज करणार तपासणीएचआरच्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट पतसंस्थेच्या नियमित कामकाजाला खऱ्या अर्थाने सोमवारपासून सुरुवात होणार अाहे.
अवसायक जितेंद्र कंडारे यांना अद्याप पतसंस्थेच्या रेकाॅर्ड सर्व्हर रूमच्या चाव्या मिळालेल्या नव्हत्या. त्या सोमवारी अधिकाऱ्यांकडून मिळणार असून ते सर्व्हरसह रेकाॅर्ड रूममध्ये ‘बीएचअार’ची सर्व कुंडली तपासणार अाहेत. यासाेबत ते बेनामी ठेवी घोटाळ्यांसंदर्भातील दस्तऐवज, लेखापरीक्षण अहवाल मिळवण्यासाठीदेखील प्रयत्न करणार अाहेत. दरम्यान, पंतसंस्थेचे अद्याप हजर झालेले कर्मचारीही हजर होणार आहेत.

अवसायक जितेंद्र कंडारे यांनी बीएचआरच्या पदाचा पदभार घेऊन आठवडा लोटला आहे. नोव्हेंबर रोजी बीएचआरचे केवळ १५ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. ३७ कर्मचारी कामावर येणे बाकी आहेत. सोमवारी त्यापैकी काही कर्मचारी कामावर हजर होण्याची शक्यता आहे. आठवडाभरानंतरही कंडारे यांना बीएचआरच्या रेकॉर्ड रूमच्या चाव्या मिळवता आलेल्या नाहीत. बीएचआरचे प्रादेशिक व्यवस्थापक प्रमोद माळी यांच्याकडे रेकॉर्ड रूमच्या चाव्या आहेत. रेकॉर्ड रूममध्ये बीएचआरचे महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. ही कागदपत्रे मिळवून कंडारे त्याआधारे बीएचआरच्या कारभाराचा अंदाज घेणार आहेत. त्याचप्रमाणे बीएचआरच्या एमआयडीसी शाखेच्या व्यवस्थापकाकडून जप्त करण्यात आलेल्या ३४ लाख रुपयांबाबतही पडताळणी करणार आहेत.

‘त्या’अधिकाऱ्यांना दूर ठेवणार काय?
बीएचआरच्यासंचालकांसह गुन्हे दाखल असलेल्या कर्मचाऱ्यांची कामकाजात लुडबुड बंद करण्याची मागणी जनसंग्राम ठेवीदार संघटनेतर्फे करण्यात आली होती. त्या अनुषंगाने अवसायक गुन्हे दाखल असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा नियमित कामकाजातील हस्तक्षेप रोखणार काय? हा औत्सुक्याचा विषय बनला आहे.

शिल्लक रकमेचा घेणार आढावा
अवसायकांनी बीएचआरच्या अधिकाऱ्यांकडून नाेव्हेंबरला लेखापरीक्षण अहवाल मागवला होता. परंतु, रेकॉर्ड रूम बंद असल्याने ताे उपलब्ध होऊ शकला नव्हता. हा लेखापरीक्षण अहवाल अवसायक तपासणार आहेत. त्याचबरोबर कर्जरोखे, ठराव रजिस्टर, वार्षिक सर्वसाधारण सभा, कर्जवाटप, वसुली यासंदर्भातील कागदपत्रे अवसायक तपासणार आहेत. बीएचअारच्या शाखांमध्ये सद्य:स्थितीत शिल्लक असलेली रक्कम कॅश इन हॅण्डबाबत अवसायक आढावा घेणार आहेत.

ठेवीदारांची सर्वाधिक गर्दी अवसायकांकडे
जिल्हाधिकारीकार्यालयात सोमवारी आयोजित करण्यात येत असलेल्या लोकशाहीदिनाला ठेवीदारांची सर्वाधिक गर्दी होत होती. ती गर्दी अाता अवसायकांच्या कार्यालयात वळती झालेली आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांना कामकाज सांभाळून ठेवीदारांचेही समाधान करावे लागणार आहे.

सर्व्हररूममध्ये शाखांची माहिती
महाराष्ट्रासहसात राज्यांमध्ये असलेल्या या मल्टिस्टेट पतसंस्थेच्या शाखांचा मुख्य सर्व्हर हा एमआयडीसीतील मुख्य शाखेत आहे. सोमवारी अवसायक सर्व्हर रूम उघडून बीएचआरच्या शाखांची माहितीही घेण्याची शक्यता आहे.