आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएचआरच्या २७ लॉकर्सच्या चाव्या कर्मचाऱ्यांना सापडेना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट पतसंस्थेच्या अवसायक म्हणून जितेंद्र कंडारे यांनी पदभार स्वीकारून जवळपास एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्याप त्यांच्या हातात पतसंस्थेचे महत्त्वपूर्ण दस्तऐवज लागलेले नाहीत. त्याचबरोबर लॉकर्सच्या चाव्याही सापडलेल्या नाहीत. शनिवारी कर्मचारी लॉकर्सच्या चाव्यांची शोधाशोध करीत होते.
मुख्य शाखा इतर शाखांचे मिळून एकूण ३५ लहान-मोठे लॉकर्स आहेत. त्यापैकी ते १० लॉकर्सच्या चाव्या अवसायकांना कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या आहेत. त्यांनी त्या लॉकर्सची तपासणीही केली. मात्र, त्यामध्ये काहीच आढळून आले नाही. इतर २७ लॉकर्सच्या चाव्यांची शनिवारी शोधाशोध सुरू होती. मात्र, कर्मचाऱ्यांना चाव्या मिळाल्या नाहीत. त्या चाव्या कुणाकडे असाव्यात, याबाबत कर्मचारी एकमेकांना विचारणा करीत होते.

काम सांगण्यावरून वाद
अवसायकांनीकामाला सुरुवात केली असली तरी त्यांना हातात ठोस कागदपत्रे मिळालेली नाहीत. त्याचबरोबर संगणकही सुरू करण्यात आलेले नाहीत. ४० कर्मचारी कामावर हजर झालेले आहेत. कर्मचाऱ्यांची दररोज मस्टरवर हजेरी घेतली जात आहे. मात्र, दिवसभर कर्मचारी पतसंस्थेमध्ये बसून असतात. शनिवारी एकमेकांना काम सांगण्यावरून कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. एमअायडीसी शाखेचे व्यवस्थापक लगड हे कार्यालयात बसून हिशेब करण्यात व्यस्त होते.

ठेवीदारांची वर्दळ
जळगावसह इतर जिल्ह्यातील २० ठेवीदार शनिवारी अवसायक कंडारे यांना भेटण्यासाठी आलेले होते; परंतु ते शुक्रवारपासून बाहेरगावी गेले आहेत. शनिवारीही ते कार्यालयात परतले नाहीत. त्यामुळे ठेवीदारांनी त्यांच्या सहायकाकडे अर्ज दिले. काही अर्जदारांनी त्यांची वाट बघितली. मात्र, ते आल्यामुळे ठेवीदारांना परत जावे लागले.