आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीएचआरच्या मुख्य शाखेसह संचालकांच्या घरांची झडती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: बीएचआरच्या मुख्य शाखेत चौकशी करताना पोलिस निरीक्षक सादरे.
जळगाव - भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या अपहाराची चौकशी मंगळवारी सुरू झाली. बीएचआरच्या मुख्य शाखेसह संचालकांच्या घरांची झडती घेतली. पोलिस निरीक्षक अशोक सादरे यांचे पथक एमआयडीसीतील मुख्य शाखेत दिवसभर थांबून होते.
बीएचआरचे संस्थापक प्रमोद रायसोनींसह १३ संचालकांना सोमवारी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली आहेत. पोलिस निरीक्षक सादरे यांच्या पथकाने बीएचआरच्या एमआयडीसीतील मुख्य शाखेत चाैकशी केली. या वेळी रायसोनी यांनाही सोबत ठेवले होते. सकाळी १० वाजेपासून या पथकाने रायसोनींची चौकशी केली. तसेच कर्जदार ठेवीदारांच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती ताब्यात घेतल्या. ही चौकशी दिवसभर सुरू होती. चौकशीसाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची माहिती मिळवण्याकरिता आर्थिक गुन्हे शाखेच्या कर्मचा-यांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यांची सुचवल्यानुसार रायसोनींच्या बँक खात्यांची माहिती घेऊन त्यांनी केलेल्या वैयक्तिक व्यवहारांची कागदपत्रेही पाेलिसांनी ताब्यात घेतली. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांनी कार्यालयात थांबून कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती हस्तगत केल्या.

आज ठेवीदारांची बैठक...
बीएचआरमध्येठेवी अडकलेल्या ठेवीदारांच्या समन्वय समितीची बैठक बुधवारी सकाळी १० वाजता गोलाणी मार्केटमधील आशीर्वाद पब्लिकेशन येथे होणार आहे, असे समितीचे राज्याध्यक्ष विवेक ठाकरे आणि जिल्हा समन्वयक शिवराम चौधरी यांनी कळवले आहे. ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्यासाठी समिती प्रयत्न करणार आहे. त्यासाठी तक्रारी गोळा करण्याकरिता ही बैठक आयोजित करण्यात आली असून, ठेवीदारांनी ठेवींच्या पावत्यांसह हजर राहावे, असे कळवण्यात आले आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे.

डॉ.महाजनांच्या घरी जाऊन चौकशी
बीएचआरचेसंचालक डॉ.हितेंद्र महाजन यांच्या बेंडाळेनगरातील घरी पोलिसांचे एक पथक गेले होते. या पथकाने त्यांच्या घरातूनही काही कागदपत्रे हस्तगत केली. त्यात बँक पासबुक इतर व्यवहारांच्या कागदपत्रांचा समावेश आहे. तिस-या पथकाने जामनेर तालुक्यातील तळेगाव शेळगाव येथील संचालकांच्या घरी जाऊन चौकशी केली.

आज न्यायालयात हजर करणार
रायसोनींसहअटक केलेल्या १३ संचालकांची पोलिस कोठडी बुधवारी संपणार आहे. त्यामुळे त्यांना बुधवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येईल. या प्रकरणाची आणखी सखोल चौकशीसाठी तपासाधिकारी संबंिधतांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी करू शकतात. तसेच बचाव पक्ष न्यायालयीन कोठडी आणि जामीन मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल.