आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुसारी यांच्या अहवालावरच मंत्रिमंडळातील जळगावचे भवितव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजपमध्ये निर्माण झालेला पेच अाणि संघटनात्मक गुंता समजून घेण्यासाठी पक्षातर्फे रवी भुसारी जिल्ह्यात येऊन गेलेत. ते पक्षश्रेष्ठींना जिल्ह्यातील भाजपच्या परिस्थितीचा अहवाल सादर करणार असून त्यावरच मंत्रिमंडळाच्या अागामी विस्तारामध्ये जळगावचे भवितव्य काय असेल, हे अवलंबून अाहे. जिल्ह्याचे पालकमंत्रिपद काेणाला दिले जावे, कार्यकर्त्यांचा राेष कमी करण्यासाठी जिल्ह्यातून इतर काेणाला संधी द्यावी का? त्यानुषंगाने भुसारी यांचा अहवाल महत्त्वाचा मानला जात अाहे.

राज्यातील क्रमांक दाेनचे मंत्री म्हणून एकनाथ खडसे यांच्याकडे पाहिले जात हाेते. त्यांच्यावर झालेल्या अाराेपांमुळे त्यांनी राजीनामा दिल्याने जिल्हा भाजपमध्ये संतापाची लाट उसळली. तसेच राजीनामा नाट्य रंगल्याने खडसेंचे उपद्रवमूल्य लक्षात घेऊन पक्षाने डॅमेज कंट्राेलची भूमिका घेतली. त्यात जिल्हा भाजपमधील परिस्थिती जाणून घेण्यासाठी रवी भुसारी यांना जिल्ह्यात पाठवण्यात अाले. गेल्या अाठवड्यात त्यांनी पक्षाची विस्तृत बैठक घेतली. त्यात खडसे समर्थकांनी त्यांना खडसेंच्या ताकदीचा हिसका दाखवला. लाेकसभा निवडणुकीच्या तिकीटवाटपापासून भुसारी यांना खडसेंच्या राजकीय प्रभावाचा परिचय असल्याने ते जिल्ह्यातील स्थिती जाणून हाेते.

दुसऱ्यामंत्र्यांचा तूर्त विचार नाही
खडसेंनीराजीनामा दिल्याने त्यांच्याएेवजी जिल्ह्यातील दुसऱ्या एखाद्या अामदारास मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा सुरू हाेती. त्यात काही इच्छुक अामदारांनी पक्षश्रेष्ठींकडे वेगवेगळी समीकरणे सादर करून या परिस्थितीत अापण मंत्रिपदास कसे याेग्य अाहाेत, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यातच खडसेंची मर्जी मात्र ते संपादन करू शकले नाही. खडसेंकडून काेणाच्याही नावाची शिफारस नाही. त्यामुळे जिल्ह्यातील स्थिती काय? हे भुसारींच्या अहवालाच्या दृष्टीने महत्त्वाचे अाहे.

पक्षाची सावध भूमिका
अागामी नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, विधान परिषद अादी निवडणुकीत खडसे गटाचे उपद्रवमूल्य लक्षात घेऊन त्यांना दुखवणारा काेणताही निर्णय घेतला जाऊ नये, अशी भूमिका पक्षाची राहणार अाहे. निवडणुका डाेळ्यासमाेर असल्याने जिल्ह्यातून इतर काेणत्याही नेत्यास मंत्रिपदाची संधी मिळण्याचीदेखील शक्यता कमीच असल्याचे जाणकारांचे मत अाहे.

परिस्थिती जैसेे थे ठेवण्याची शक्यता
खडसेंनासर्व चाैकशांमधून क्लीन चिट दिल्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळात घेतले जाईल, याची शाश्वती देत कार्यकर्त्यांचा राेष कमी करण्यासाठी जिल्ह्यातून इतर काेणत्याही अामदारास मंत्रिपद दिले जाऊ शकत नाही. खडसेंचे राजकीय महत्त्व कमी हाेईल, असे काेणतेही पाऊल उचलताना पक्षाने काळजी घेणे साेईस्कर ठरेल. पालकमंत्रिपद देताना खडसे समर्थक काेणास सहकार्य करतील, याचा पक्षाने विचार करावा अादी बाबींचा समावेश भुसारींच्या अहवालात असणार अाहे.

जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाबाबत पेच
जिल्ह्याचे पालकमंत्रिपद माजी मंत्री खडसे यांच्याकडे हाेते. जिल्ह्यात प्रस्त वाढवण्यासाठी रिक्त असलेले पालकमंत्रिपद जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी घ्यावे, म्हणून महाजन गट सक्रिय झाला अाहे. दरम्यान, खडसे समर्थकांचा पूर्ण राेष महाजनांच्या दिशेेने असल्याने खडसेंकडे असलेले पद महाजनांना दिल्यास जळगाव जिल्ह्यात भाजपमध्ये गटबाजी वाढीला लागेल. पक्षाला त्याचे नुकसान हाेऊ शकते. या निर्णयामुळे खडसे समर्थक अधिक डिवचले जाण्याची शक्यता अाहे.

कामाचा अहवाल देणार
गेल्या अाठवड्यात जळगाव जिल्ह्यात अालेले रवी भुसारी हे त्यांनी घेतलेल्या बैठकीच्या कामकाजाचा अहवाल प्रदेश कार्यालयाला देणार अाहेत. अागामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर त्यांचा दाैरा हाेता. उदय वाघ, जिल्हाध्यक्ष, भाजप
बातम्या आणखी आहेत...