आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ : दोन तासांमध्ये 100 पोलिसांनी संकलित केला 10 ट्रॅक्टर कचरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिस वसाहतीच्या प्रवेशद्वारा शेजारील काटेरी झुडुपे तोडण्यात आली. - Divya Marathi
पोलिस वसाहतीच्या प्रवेशद्वारा शेजारील काटेरी झुडुपे तोडण्यात आली.
भुसावळ - अस्वच्छतेमुळे शहराचे नाव देशभरात झळकल्याने शहरात विविध सामाजिक संस्थांनी स्वच्छता मोहीम राबवली होती. याच पार्श्वभूमीवर सहायक पाेलिस अधीक्षक नीलाेत्पल यांनी रविवारी सकाळी ते या वेळेत पोलिस वसाहतीत स्वच्छता अभियान राबवले. १०० पोलिस कर्मचारी, अधिकारी आणि पोलिसांच्या पाल्यांनी मोहीमेत सहभाग नोंदवला. दोन तासात १० ट्रॅक्टर कचरा संकलित करण्यात आला. 
 
पाेलिस वसाहतीत मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण झाल्याने रविवारी स्वच्छता करण्यात आली. गेल्या रविवारीच ही माेहिम राबविली जाणार हाेती. मात्र त्या दिवशी पाऊस झाल्याने सफाई माेहिम स्थगीत करण्यात अाली हाेती. रविवारी सकाळी वाजेपूर्वीच शहर, बाजारपेठ तालुका पाेलिस ठाणे, कंट्राेल रूम येथील पाेलिस कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात अाले. प्रत्येक पाेलिस ठाण्यातून ३० पेक्षा अधिक पाेलिस कर्मचारी आणि आरसीपी कर्मऱ्यांनी सफाई अभियानात सहभाग नाेंदवला. अशी झाली सफाई 
 
पाेलिस वसाहतीत सर्वात प्रथम काडी-कचरा गाेळा करण्यात अाला. तसेच परिसरातील कचरा संकलित करण्यात आला. पाेलिस कर्मचाऱ्यांनी हातात झाडू, फावडे, घमेले घेऊन स्वच्छता केली. डीवायएसपी कार्यालयाचा परिसर, पाेलिस कर्मचारी निवासस्थानांचा परिसर, मंगल कार्यालय, पाेलिस अधिकारी निवासस्थानांचा परिसर, जुनी निवासस्थाने या भागात स्वच्छता करण्यात आली. सहभागी पोलिस कर्मचाऱ्यांनी पीटीचा गणवेश परिधान केला होता. प्रत्येक पाेलिस ठाण्यातील पाेलिस उपनिरीक्षकांंनीही सफाई अभियानात हजेरी लावली. 
 
हाती घेतला झाडू 
रविवारी सकाळी सफाई माेहीम सुरू झाल्यावर सहायक पाेलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्वत: हातात झाडू घेतल्याने अन्य अधिकारीसुद्धा कामाला लागले. डीवायएसपी कार्यालयाच्या बाहेर भिंतीलगत वाळलेली काटेरी झुडुपे कापण्यात आली. पाेलिस निरीक्षक वसंत माेरे, निरीक्षक चंद्रकांत सराेदे, सहायक पाेलिस निरीक्षक एम.एम.मुळूक, मनाेज पवार यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारीदेखील मोहिमेत सहभागी झाले.
 
ज्या परिसरात अापण राहाताे ताे परिसर स्वच्छ करणे अापले कर्तव्य अाहे. त्यामुळे प्रत्येकाने अापला परिसर स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घ्यावा. याच भावनेतून रविवारी सकाळी पोलिस वसाहतीत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नीलाेत्पल,सहायक पाेलिस अधीक्षक 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...