आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर आम्ही भाजपच्या जागांवर दावा करू - चंद्रकांत पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - आकडेवारीचे निकष लावायचे असल्यास जरूर लावा. जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व आहे व आम्ही तेथे भाजपच्या खासदाराला विजयी केले. 1990मध्ये मुक्ताईनगरात सेनेची ताकद असल्याने भाजपचा विजय झाला होता.
आता कोणी आकडेवारी दाखवून भुसावळची जागा मागत असेल, तर आम्हीसुद्धा भाजपच्या जागांवर दावा करू शकतो, अशा शब्दात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी भुसावळ भाजप तालुकाध्यक्षांची मागणी धुडकावत सबुरीने घेण्याचा सल्ला दिला.

जावळे यांनी शिवसेनेच्या वाट्याला असलेली भुसावळची जागा भाजपला द्या, असा आपटबार रविवारी फोडला. तत्पूर्वी जुलै महिन्यात खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगावातील मेळाव्यात भुसावळची जागा लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतरही भाजपने भुसावळच्या जागेची मागणी केली. त्यावर जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त करत काँग्रेस आघाडीमुळे त्रस्त जनतेला न्याय देण्यासाठी महायुती मैदानात उतरली आहे.
मात्र, काही जबाबदार पदाधिकारी विनाकारण वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत असतील तर पक्षश्रेष्ठींना माहिती देऊ, असे सांगितले. उपनेते गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, कार्यकर्ते मागणी करू शकतात. मात्र, अंतिम निर्णय महायुतीचे वरिष्ठ नेते घेतात. या निर्णयानुसार उमेदवाराला विजयी करण्यासाठी सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते काम करतात, असे सांगितले.