आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhusaval Municipal Deputy Chairman Of The City Office Election

भाजपचे व्यासपीठ गाजवणाऱ्या लाेणारींच्याच नावाचा पक्षादेश!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - भुसावळ पालिकेची उपनगराध्यक्षपदाची निवडणूक फेब्रुवारी राेजी दुपारी वाजता पालिकेच्या सभागृहात हाेणार अाहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते हाजी नईम खान सिद्दीक खान पठाण यांनी त्यांचेच नगरसेवक पण पालिका पाेटनिवडणुकीत भाजपचे व्यासपीठ गाजवणारे युवराज लाेणारींच्या नावाचा पक्षादेश काढला अाहे. भाजप खान्देश विकास अाघाडीने लाेणारींना दीड वर्षांपूर्वी नगराध्यक्ष निवडणुकीत मदत केली हाेती. म्हणून ते उमेदवार देतात की नाही? हे पाहणे अाैत्सुक्याचे ठरेल.
उपनगराध्यक्षपदाची निवड अवघ्या सात दिवसांवर असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वप्रथम पक्षादेश काढून राजकीय वातावरण तापवण्याची खेळी खेळली अाहे. राष्ट्रवादी नगरसेवकांना गटनेते हाजी नईम खान यांनी बजावलेला पक्षादेश बुधवारी (२७ जानेवारी) मिळाला अाहे. त्यात युवराज दगडू लाेणारी यांना हात उंचावून मतदान करावे. पक्षादेशाचे उल्लंघन करून विराेधकांना मतदान केले अथवा अनुपस्थित तटस्थ राहिले तर ‘महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती अाैद्याेगिक नगरी सन १९६५च्या अन्वये महाराष्ट्र प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९६८ नियम १९८७ अंतर्गत नवीन झालेल्या कायद्याच्या सुधारणेनुसार अपात्रतेची कारवाई केली जाईल’, असे नमूद करण्यात अाले अाहे. मात्र, राष्ट्रवादी गटनेत्यांनी बजावलेल्या या पक्षादेशावर दिनांक, जावक क्रमांकच नाही. त्यामुळे भविष्यात या मुद्यावर कायदेशीर लढा उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

...तर भाजप, खाविअाची गाेची
पालिकेत भाजपचे ११, खान्देश विकास अाघाडीचे असे १९ संख्याबळ अाहे. उपनगराध्यक्ष निवडणुकीत उमेदवार दिला नाही तर पालिकेच्या अागामी सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांमध्ये सत्ताधाऱ्यांशी ‘मिलीभगत’ असल्याचा संदेश जाऊ शकताे. ती वेळ येऊ नये, म्हणून खाविअाला साेबत घेऊन राष्ट्रवादीत फूट पाडून तगडा उमेदवार देण्याची खेळी भाजप एेनवेळी खेळण्याची शक्यताही नाकारता येऊ शकत नाही.

^भाजपचे ज्येष्ठनेते पालकमंत्री एकनाथ खडसे, अामदार संजय सावकारे यांचे मार्गदर्शन घेऊ. त्यानंतर सर्व सदस्यांची मते लक्षात घेऊन उमेदवार देऊ. अागामी सार्वत्रिक निवडणूक डाेळ्यासमाेर ठेऊन उपनगराध्यक्ष भाजपचाच व्हावा, यासाठी शक्ती पणाला लावू. प्रमाेद नेमाडे, गटनेते,भारतीय जनता पक्ष

^खान्देश विकासअाघाडीच्या सदस्यांची बैठक २९ जानेवारीला बाेलवण्यात अाली अाहे. त्यात प्रत्येकाशी सखाेल चर्चा, विचारमंथन करून निर्णय जाहिर करण्यात येईल. साधारणत: ३० जानेवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचा अामचा प्रयत्न राहील. किरण काेलते, गटनेते,खान्देश
पक्षीय बलाबल

सत्ताधारी नगरसेवक बुचकळ्यात
गटनेत्यांनी पक्षादेश काढलेले लाेणारी हे कायदेशीर राष्ट्रवादीचेच सदस्य अाहेत. मात्र, दीड वर्षांपूर्वी विधानसभा निवडणूक, गेल्या तीन अाठवड्यांपूर्वी पालिकेची दाेन जागांसाठी झालेल्या पाेटनिवडणुकीत त्यांनी भाजपचे कमळ चिन्ह असलेला फटका गळ्यात घालून राष्ट्रवादीच्या उमेदवारांना धडा शिकवण्याची भीमगर्जना व्यासपीठावर केली हाेती. राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली पुन्हा दिसणार नाही, अशी भूमिका त्यांनी यापूर्वी मांडली अाहे. मात्र, तरी त्यांच्या नावाचा व्हीप निघाल्याने सत्ताधारी बुचकळ्यात पडले अाहेत.

नाट्य रंगणार : नगराध्यक्षनिवडणुकीत जसे पक्षादेश नाट्य रंगले हाेते, तसे पुन्हा रंगण्याचे संकेत अाहेत. दरम्यान, राष्ट्रवादी गटनेते यांनी खेळलेल्या चालीच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला. मात्र, त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही, म्हणून थेट संपर्क हाेऊ शकला नाही.

संतोष चाैधरी अन‌् भाजपला ‘दे धक्का’
राष्ट्रवादीच्या गटनेत्यांनी दीड वर्षांपूर्वी नगराध्यक्ष निवडीत युवराज लाेणारींविराेधात मतदान करण्याचा पक्षादेश अापल्या सदस्यांना बजावला हाेता. एवढेच नव्हे तर पक्षादेशाचे उल्लंघन करणाऱ्या चाैघांच्या अपात्रतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिकादेखील दाखल केली हाेती. नाट्यमय घडामाेडीनंतर ही याचिका त्यांनी मागेही घेतली हाेती. त्याच गटनेत्यांनी फेब्रुवारीला हाेणाऱ्या उपनगराध्यक्ष निवडीसाठी लाेणारींच्या नावाचा पक्षादेश बजावल्याने खळबळ उडाली अाहे. गटनेत्यांची ही भूमिका संताेष चाैधरींसह पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘कमळ’ फुलवण्याची मनीषा असलेल्या भाजपला धक्का देणारी असल्याचे मानले जात अाहे.