आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभरात तब्बल २१ कोटी थकबाकी वसुलीचे आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - मालमत्तेसह विविध संलग्न कर आणि पाणीपट्टी देयके मिळून मार्चअखेरपर्यंत सुमारे २१ कोटी ७६ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्याचे आव्हान भुसावळ पालिकेसमोर आहे. सुमारे ११ महिन्यांत केवळ १२ टक्के कर वसुली झाली असून उर्वरित ८८ टक्के रक्कम अवघ्या महिनाभरात कशी वसूल करणार? असा प्रश्न प्रशासनासमाेर उभा ठाकला अाहे.
पालिकेच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून अत्यल्प वसुली होत आहे. गेल्या वर्षी केवळ ४१ टक्के कर वसुली झाली होती. दोन वर्षांपासून थकित रकमेच्या आकड्यांत मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. वसुली मात्र कमालीने घटली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मूलभूत सुविधा पुरवताना पालिका प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. वसुली रखडल्याने पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असून विविध विकास कामांसाठी पालिकेस द्यावा लागणारा हिस्साही भरणे अवघड झाले आहे. त्यामुळे नागरिकांना मूलभूत सुविधा मिळण्यात कुचराई होत आहे.
दुसरीकडे विकास कामांना खीळ बसली आहे. कर भरण्यात नागरिकांची उदासीनता आणि वसूल करण्यास कर्मचाऱ्यांची दिरंगाई या दोन्ही गोष्टी त्यासाठी कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. मालमत्ता करासह विशेष स्वच्छता कर, अग्निशमन कर, वृक्षकर, शिक्षण कर, मल:निस्सारण कर आदी करांपोटी मागील वर्षाच्या थकबाकीसह एकूण २१ कोटी ७६ लाख रुपयांची मागणी आहे. यापैकी फेब्रुवारीपर्यंत केवळ कोटी ४९ लाख रुपयांची अर्थात केवळ ११ टक्के कर वसुली करण्यात आली होती. अद्यापही नागरिकांकडे तब्बल २० कोटी ३७ लाख रुपयांची रक्कम थकित आहे. केवळ महिनाभराच्या कालावधीत अर्थात मार्चअखेरपर्यंत पालिकेसमाेर ही रक्कम वसूल करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले असून कर्मचाऱ्यांची दमछाक हाेणार अाहे.

वसुलीसाठी ११ विभाग : कराचीरक्कम वसूल करण्यासाठी तब्बल ११ विभाग आहेत. प्रत्येक विभागात एक पथक वसुलीसाठी कार्यरत करण्यात अाले आहे. शहराचा परिघ किमान १० किलोमीटरचा असून तब्बल ४० हजार करदाते आहेत. प्रत्येक घरात जाऊन कर मागणी पत्रक देणे, वसुली करणे यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग असावा. मात्र, पालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने कर वसुलीवर परिणाम होण्याचे संकेत प्राप्त झाले अाहेत.

^पालिकेची करवसुली अधिक प्रमाणात झाली तर शासनाकडून मिळणाऱ्या फंडात अधिक वाढ होऊ शकेल. नगरपालिका फंडात अधिक निधी असल्यानंतर तातडीची कामे या निधीतून करता येतात. गेल्या दोन वर्षांपासून कमी प्रमाणात वसुली होत आहे. यामुळे शहराचा विकास करता येत नाही. नागरिकांनी थकबाकी वेळेत भरून कारवाईचा कटू प्रसंग टाळावा. अख्तर पिंजारी, नगराध्यक्ष,भुसावळ

^शहरातील तब्बल१२० गाळेधारक थकबाकीदारांना पालिकेने नोटीस बजावल्या आहेत. एप्रिलपर्यंत त्यांनी थकित रकमेचा भरणा केल्यास त्यांचे व्यावसायिक गाळे सील केले जातील. यासह त्याचवेळी वीज वितरण कंपनीकडून दिला गेलेला वीजपुरवठाही बंद केला जाईल. मालमत्ताधारकांनाही नियमानुसार १५१च्या नोटीस बजावल्या आहेत. बी. टी. बाविस्कर, मुख्याधिकारी,भुसावळ

वेतनावर गंडांतर
विभाग निहाय थकबाकीचे प्रमाण काढले जाणार आहे. ज्या विभागात जितकी थकबाकी वसूल झाली, त्या तुलनेत कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाईल. टक्केवारीच्या तुलनेत वेतन मिळणार असल्याने किमान कर्मचारी जोमाने काम करतील, अशी आशा आहे. याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे.

Áसंकुलाचे भाडेपट्टेही थकित : शहरातपालिकेच्या मालकीची लहानमोठी ३० संकुले आहेत. यातील गाळे भाडेपट्ट्यावर देण्यात आली आहेत. यातील तब्बल ११७६ गाळेधारकांकडे ५० ते ५२ लाखांची थकबाकी आहे. यामुळे पालिकेने आता प्रथम या गाळेधारकांवर कारवाईसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासह मालमत्ताधारकांवरही थकबाकी भरल्यास कारवाई अटळ आहे.

वसुलीसाठी ढोलबडवणार : मालमत्ताकर वसुलीसाठी आता करदात्यांच्या घरासमोर ढोल बडवण्यात येणार आहेत. यासह प्रत्येक भागांमध्ये लाऊड स्पीकरद्वारे नागरिकांना आपल्या करांच्या रकमा वेळेत भरा, अन्यथा मालमत्ता जप्तीची कारवाई होईल, असा निर्वाणीचा इशारा देण्यात येणार आहे. यामुळे काही प्रमाणात का होईना, कर वसुली होण्यास मदत होईल.
नोटीस लावताना कर्मचारी.