आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुसावळ ते जळगावचा पास मिळेल 300 रुपयांना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - रेल्वेने प्रवासी भाड्यात 14.2 टक्के वाढ केली असून या निर्णयाची अंमलबजावणी बुधवारपासून होणार आहे. भुसावळ स्थानकावरून गेल्या तीन दिवसांत 154 प्रवाशांनी मासिक मुदतीचे पास काढले आहेत. जुन्या दरानुसार जळगावच्या पाससाठी 160 रुपये आकारले जायचे. आता नव्या दरानुसार त्यात 140 रुपयांनी वाढ होणार असून 300 रुपये भाडे आकारले जाणार आहे.

शिक्षण, व्यवसाय अन् नोकरीच्या निमित्ताने जवळपास दीड ते दोन हजार जण दररोज रेल्वेने प्रवास करतात. बहुतांश प्रवासी हे मासिक पास काढण्यावर भर देतात. रेल्वेने भाडेवाढीचा निर्णय घेतल्यामुळे पासधारक संभ्रमात आहेत. तरीही अनेकांनी मंगळवारी जुन्या दरानुसार पास काढून घेतली. रेल्वेने अप-डाऊन करण्यासाठी 150 किलोमीटर अंतरापर्यंतचाच पास दिला जातो.
विद्यार्थ्यांची संख्या जास्त
भुसावळ रेल्वे स्थानकावरून भुसावळ ते चाळीसगाव व भुसावळ ते अकोला इथपर्यंतचे पास देण्यात येत आहेत. जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, निंभोरा, बोदवड, वरणगाव, बोदवड, मलकापूर, नांदुरा, अकोला, बर्‍हाणपूर, मलकापूर या मार्गावर अप-डाऊन करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.
40 किलोमीटरचे तिकीट ‘जैसे थे’
रेल्वेचा प्रवास सुरू करण्याच्या ठिकाणापासून ते 40 किलोमीटरच्या आत अंतरावरील स्थानकासाठीचे तिकीट काढले तर भाडेवाढीचा फटका बसणार नाही; कारण रेल्वेने 40 किलोमीटर अंतरापर्यंत भाडेवाढ केलेली नाही. 41 किलोमीटरपासून पुढील अंतरासाठी भाडेवाढ होणार आहे. शाळा सुरू झाल्याने आता पासेस काढण्यासाठी दोन दिवसांत विद्यार्थ्यांची गर्दी होईल.

प्रवाशांना द्यावा लागेल फरक
४रेल्वे मंत्रालयाने केलेल्या भाडेवाढीची अंमलबजावणी बुधवारपासून होईल. ज्या प्रवाशांनी जुन्या दरानुसार आरक्षण तिकीट काढले आहे, त्यांच्याकडून फरकाची रक्कम घेतली जाणार आहे. प्रवाशांनी नियमांचे पालन करून रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.
एन. जी. बोरीकर, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, भुसावळ