आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ - मुंबई रेल्वे सुरू करण्याची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पठाणकोट एक्स्प्रेस लवकरच छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) येथून सुटणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकाद्वारे कळवली आहे. यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी भेट घेऊन खडसे यांनी मागणी केली होती.

पठाणकोट एक्स्प्रेस पूर्वी दादर येथून सुटत होती. मात्र, आता ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस(कुर्ला) येथून सोडण्यात येते. त्यामुळे सायंकाळी कामे आटोपून जळगाव, नाशिक, धुळे, अहमदनगर येथील प्रवासी आणि व्यवसायिकांना परत येण्यासाठी त्रास होत होता. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब आणि हरियाणा या राज्यांतील जनतेच्या सोयीसाठी तेथील लोकप्रतिनिधींनीही गाडी सुटण्याचे ठिकाण बदल करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात खडसे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची दिल्लीत भेट घेतली.
त्या वेळी त्यांनी ही मागणी केली. पठाणकोट एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून सोडण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयात सादर केला असून त्यावर लवकरच निर्णय होईल, असे प्रभू यांनी खडसे यांना सांगितले.

खडसे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे दादर-धुळे, भुसावळ-मुंबई नवीन गाडी सुरू करण्याची मागणी केली. तसेच अमरावती एक्स्प्रेसला ते नवीन अतिरिक्त डबे जोडण्याचीही मागणी केली. राज्यात अधिकाधिक नव्या गाड्या सुरू करण्याची मागणी केली.