आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवापूर्वीच उपद्रवींवर एमपीडीएची कारवाई होणार, अप्पर पोलिस अधीक्षक बच्चनसिंग माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- अागामी गणेशाेत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण हाेऊ नये यासाठी शहरातील उपद्रवींविरुद्ध एमपीडीए अाणि हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले अाहेत. गणेशाेत्सवापूर्वीच हद्दपारी एमपीडीएचे अादेश निघावेत यासाठी पाेलिस प्रशासनाचे प्रयत्न सुरू अाहेत, अशी माहिती अप्पर पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली.
 
शुक्रवारी डीवायएसपी कार्यालयात त्यांनी विभागातील पाेलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही जणांचे एमपीडीएचे तर १४ जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. शहरातील खऱ्या गुन्हेगारांना या काळात हद्दपार केले जाणार अाहे. विनाकारण काेणालाही यात अडकवले जाणार नाही. प्रत्येक पाेलिस ठाण्यातील कर्मचारी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना साेबत घेऊन ३० जणांचे पथक तयार केले जाणार अाहे. यात क्रीडा क्षेत्रात निपूण असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देऊन त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे पथक पोलिसांसोबत काम करेल, असे बच्चनसिंग यांनी सांगितले. सहायक पोलिस अधीक्षक नीलोत्पल उपस्थित होते.
 
अारएफअायडी यंत्रणा : रात्रीच्यागस्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात पाच ठिकाणी अत्याधुनिक रेडीअाे फ्रिक्वेंन्सी आयडेंटीटी मशीन बसविले जाणार अाहे. त्यामुळे रात्री गस्तीवरील पाेलिस कर्मचारी कुठे आहेत, याची माहिती वरीष्ठ अधिकाऱ्यांना मिळणार आहे.
 
ग्रामीण भागास भेट
ग्रामीणभागात पाेलिस निरीक्षक, सहायक पाेलिस अधीक्षक भेट देत अाहेत. गावात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रयत्न सुरू अाहेत. उपद्रवींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात अाहे. यादीवरील गुन्हेगारांंवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केल्याचे बच्चनसिंग यांनी सांगितले.
 
अवैध शस्त्र जप्त करू
भुसावळशहरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांचा शाेध घेण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात अाली असून गावठी कट्टा, तलवार अादी शस्त्रे शाेधण्याच्या सूचना दिल्या अाहेत. त्यामुळे शहरातून गाेपनीय माहिती काढण्याचे काम पाेलिस प्रशासनाकडून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
 
अाॅनलाइन सुविधा
तक्रारदारालापाेलिस ठाण्यात जाता माेबाइलवरून पोलिस प्रशासनाच्या वेबसाइटवर ऑनलाइन तक्रार दाखल करता येणार अाहे. तसेच जिल्ह्यातील पाेलिस ठाण्यातील गुन्ह्यांची माहिती अपलाेड केली जात अाहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पाेलिस ठाण्यातील तक्रारींची माहिती मिळेल, असे अप्पर अधीक्षकांनी सांगितले.
 
बातम्या आणखी आहेत...