आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळची उंची दुपटीने वाढणार; 20 टक्के वाढीव ‘एफएसआय’चा फायदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- ‘अ’ वर्ग नगरपालिकांमध्ये 20 टक्के वाढीव एफएसआय लागू होण्याचे संकेत आहेत. यामुळे जागेची अडचण आणि घरांच्या वाढलेल्या प्रचंड दरावर काही अंशी नियंत्रण येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘व्हर्टिकल डेव्हलपमेंट’ या संकल्पनेनुसार भुसावळात तीनऐवजी पाच मजली इमारती उभ्या राहतील.

सुमारे दोन लाख लोकसंख्येचे भुसावळ जिल्ह्यातील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे. शिक्षण, रोजगार, नोकरी, उद्योगांमुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिक रहिवासासाठी भुसावळला प्राधान्य देतात. यामुळे घरांची मागणी वाढून जागांचे दर गगनाला भिडले आहेत. परिणामी जागा घेऊन स्वतंत्र घराचे बांधकाम करण्यापेक्षा ‘प्लॉट सिस्टीम’ने शहरात बाळसे धरले. मात्र, ‘अ’ वर्ग पालिकेत फक्त 1 एफएसआयला मंजुरी असल्याने ‘प्लॉट सिस्टीम’ असली तरी अपार्टमेंटची उंची 15 मीटरपेक्षा जास्त वाढवता येत नाही. 20 टक्के वाढीव एफएसआयमुळे ही उंची 18 मीटरपर्यंत होऊन शहरात तीनऐवजी पाच-सहा मजली इमारती बांधता येतील.

दरम्यान, निर्णयाला अंतिम मंजुरी अजून मिळालेली नाही. मात्र, वाढीव एफएसआय, टीडीआरचा फायदा होईल. टीडीआर म्हणजे एखाद्याने आरक्षणातील जागा पालिकेला मोफत दिल्यास, तेवढय़ा क्षेत्राचा टीडीआर पालिका त्याला ऑन पेपर उपलब्ध करून देते. संबंधिताला या टीडीआरचा इतरत्र बांधकाम करताना झोनच्या र्मयादेनुसार वापर किंवा त्याची दुसर्‍याला विक्री करता येते, असे पालिकेचे प्रभारी नगररचनाकार बी.एल.वाणी यांनी सांगितले. दरम्यान, शहरात 24 मीटर उंचीच्या बांधकामास परवानगी देता येऊ शकते. मात्र, पालिकेकडे उपलब्ध असलेली अग्निशमन यंत्रणा फक्त 15 मीटर उंचीपर्यंतची आग आटोक्यात आणता येईल, अशा क्षमतेची आहे. यामुळे 24 मीटर उंचीची एकही परवानगी आतापर्यंत देण्यात आलेली नाही.

शहरातील बांधकाम व्यावसायिकांकडून प्रस्तावित निर्णयाचे स्वागत


मर्यादा येतात
आपल्याकडे फक्त 15 मीटर उंचीची इमारत बांधता येते. त्यातही पार्किंगची उंची 2.40 तर एका मजल्याची उंची 2.75 ते 3 मीटर असणे अपेक्षित असते. -गोपाळ महाजन, संचालक, पाटील-महाजन कंपनी, भुसावळ

दर आवाक्यात येतील
एफएसआयमुळे जागेचे बांधकाम क्षेत्र वाढून घरांचे दर आवाक्यात येतील. बांधकाम व्यावसायिकांना 10 ते 15 टक्के सूट देणे शक्य होईल. पालिकेचे उत्पन्न वाढेल. हा पैसा शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वापरता येईल.
-विजय चौधरी, संचालक, स्टार लॅण्ड डेव्हलपर्स

जास्त बांधकाम शक्य
नवीन नियमांमुळे प्लॉटधारकांना 1 ऐवजी 1.20 टक्के एफएसआय मिळेल. अर्थातच 15 मीटर उंचीचे बंधन कमी होऊन, ही मर्यादा 18 मीटरपर्यत होईल. रेडीरेकनर दरानुसार पालिकेत पैसे भरून 20 टक्के वाढीव एफएसआय वापरता येईल.
-अनंत धामणे, प्रभारी सहायक संचालक, नगररचना विभाग

या भागात आहे संधी
शहरात शांतीनगर, सहकारनगर, तापीनगर, गणेश कॉलनी, गजानन महाराजनगर, भिरुड कॉलनी, सुरभीनगर, यशोधन पार्क आणि जामनेरोड परिसरात घरांची सर्वाधिक मागणी आहे. वाढीव एफएसआयमुळे या भागात पाच मजली इमारती उभ्या राहू शकतात.

पालिकेला लाभ
> 1.20 एफएसआयला मंजुरी मिळाल्यास सर्वाधिक फायदा बांधकाम व्यावसायिकांना होणार
> बांधकाम क्षेत्राची मर्यादा वाढवून मिळाल्यास कमी जागेत जास्त बांधकाम शक्य होईल
> कमी एफएसआयमुळे काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे होतात. सुधारणेनंतर हे प्रकार थांबण्यास मदत
> जीना, टेरेसची जागा एफएसआय बाहेर ठेवल्यास मोठाच फायदा. घराचे बांधकाम क्षेत्र वाढवता येईल.
> उंचीची मर्यादा वाढल्याने इमारतीमध्ये तीनऐवजी पाच ते सहा मजल्यापर्यंत बांधकाम
>नगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये कर रूपाने पडणार भर

अशी आहे सध्याची स्थिती
> सध्या 1 एफएसआय आहे.फक्त 15 मीटर उंच इमारतीच्या बांधकामास परवानगी. प्रत्येक मजला, पार्किंगला उंचीचे बंधन
> विशिष्ट भागात घरांची मागणी असली तरी, इमारतीच्या 15 मीटर उंचीच्या र्मयादेमुळे अडचण कायम
> फक्त तीन मजल्यांपर्यंत बांधकामामुळे संधी आणि मागणी असूनही जागेचा अतिरिक्त वापर अशक्य
> जागेचे दर वाढल्याने ग्राहक कमी क्षेत्र खरेदी करतो. त्यातही र्मयादित बांधकाम करता येते
> सध्या 1 एफएसआय आहे.फक्त 15 मीटर उंच इमारतीच्या बांधकामास परवानगी. प्रत्येक मजला, पार्किंगला उंचीचे बंधन
> विशिष्ट भागात घरांची मागणी असली तरी, इमारतीच्या 15 मीटर उंचीच्या र्मयादेमुळे अडचण कायम
> फक्त तीन मजल्यांपर्यंत बांधकामामुळे संधी आणि मागणी असूनही जागेचा अतिरिक्त वापर अशक्य
> जागेचे दर वाढल्याने ग्राहक कमी क्षेत्र खरेदी करतो. त्यातही र्मयादित बांधकाम करता येते