आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पंक्चर’च्या सोल्युशनची नशा; भुसावळमध्ये 10 बालके पकडली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - सायकलचे पंक्चर जोडण्याचे सोलेशन (सिंथेटिक रबरबेस अधेसिव्ह) हुंगून नशा करणार्‍या 10 अल्पवयीन मुलांना लोहमार्ग पोलिसांनी भुसावळ जंक्शनवर ताब्यात घेतले. त्यांना नागपूर येथील ‘प्लॅटफार्म ज्ञानमंदिर जीआरपी निवासी शाळेत’ हलवण्यात आले आहे.
रेल्वेगाडीत साफसफाई करण्यापासून ते भुरट्या चोर्‍या करून उदरनिर्वाह करणार्‍या अल्पवयीन मुलांची संख्या लक्षणीय आहे. यापैकी काही मुलांची व्यसनाधिनतेकडे वाटचाल सुरू आहे. जागतिक अंमलीपदार्थ विरोधीदिनी लोहमार्ग पोलिसांनी पंक्चर जोडण्यासाठी वापरले जाणारे सोलेशन हुंगून नशा करणारी 6 ते 18 वयोगटातील 10 मुले आढळली. पोलिसांनी त्यांच्याजवळून 6 ट्यूब ताब्यात घेतले. या मुलांना बालसुधारगृहात न पाठवता नागपूर येथील ‘प्लॅटफार्म ज्ञान मंदिर जीआरपी निवासी शाळेत’ पाठविण्याचे आदेश अधीक्षक जाधव यांनी दिले.