आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिस्तूलचा धाक दाखवून 2 लाखाची रोकड लंपास, 12 जणांवर दरोड्याचा गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - शेतकर्‍याला मारहाण करून गावठी पिस्तूलचा धाक दाखवून रोकड व दागिने लांबवल्याप्रकरणी रतनसिंग कृष्णावत राजपूत याच्यासह 12 जणांविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला. न्यायालयाच्या आदेशावरून हा गुन्हा दाखल झाला हे विशेष.

भुसावळातील जळगाव रोडवरील र्शीनगरातील विश्वनाथ रघुनाथ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, 1 ऑक्टोबर 2013 रोजी रात्री 11.30 ते 11.45 वाजेच्या सुमारास रतनसिंग राजपूत, देवीदास कोळी व 10 ते 12 जणांनी घरी येऊन मारहाण केली. घरातील 1 लाख 75 हजार रुपये रोख व 20 तोळे सोन्याचे दागिने लांबवले. तसेच लाठय़ा-काठय़ांनी मारहाण करून गावठी पिस्तूलचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा आशयाच्या तक्रारीवरून न्यायालयाच्या आदेशाने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक दिलीप पगारे करीत आहेत.

गौणखनिजाचा वाद
रतनसिंग राजपूत याने आपल्या शेतातून डबर व मुरूम काढून नेला आहे. त्याचा मोबदला कमीत कमी 12 ते 15 लाख रुपये मिळाला पाहिजे. म्हणून त्याच्याकडे मागणी केली. मात्र, त्याने तो दिला नाही. स्कॉर्पिओ व लाल रंगाच्या टाटा सुमो या दोन्ही वाहनामंध्ये 10 ते 12 जणांना सोबत घेऊन लाठय़ा-काठय़ा आणि हॉकी स्टीकच्या सहाय्याने मारहाण केली. पोटात पिस्तूल लावून जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असे विश्वनाथ पाटील यांनी तक्रारीत नमूद केले आहे.