आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दीपनगर वीज प्रकल्पाच्या चाचणीदरम्यान राखेचा पाऊस ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ: दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील राखेच्या प्रदूषणामुळे परिसर होरपळला जात आहे. यात भरीस भर म्हणून विस्तारीत प्रकल्पाच्या चाचणीदरम्यानच प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रकल्पातून निघणारी प्लॅय आणि बॉटम अँश दोन किलोमिटरच्या परिघात उडते. त्यामुळे पिंप्रीसेकम-फुलगाव परिसराची डोकेदुखी वाढली आहे. भुसावळपर्यंत राख उडत असल्याचे उघड झाले आहे.
दीपनगर विस्तारीत प्रकल्पातून सध्या चाचणीदरम्यान 160 मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येत आहे. मात्र, चाचणी सुरू असतानाच प्रदूषणाची समस्या गंभीर झाली आहे. पिंप्रीसेकम गाव विस्तारीत प्रकल्पाच्या उत्तर-पूर्व दिशेकडे आहे. सध्या वार्‍याचा वेग याच दिशेने जास्त आहे. एक हजार मेगावॉट वीजनिर्मितीची स्थापित क्षमता असलेल्या या प्रकल्पातून सध्या केवळ 160 मेगाव्ॉट वीजनिर्मिती होत आहे. मात्र, असे असतानाही परिसर प्लॉय अँशने अक्षरक्ष: माखला आहे. आठ दिवसांपासून विस्तारीत प्रकल्पातून निघणारी राख उडत असल्याने शेतीचे नुकसान होत आहे. पिंप्रीसेकम परिसरात उन्हाळी कपाशीची लागवड करण्यात आली आहे. मात्र, शिवारातील जमिनीवर राखेचा थर जमा झाल्याने बियाण्याच्या उगवणशक्तीवर विपरित परिणाम होत आहे. विस्तारीत प्रकल्प परिसरातील रस्त्यावरून रहदारी करणारेही उडणार्‍या राखेमुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे अधिकार्‍यांविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसते. बॉटम अँश सेक्शनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने किंवा कंटेनरमध्ये राख भरताना काळजी घेतली जात नाही. यामुळे हवेच्या झोताबरोबर राख गावाच्या दिशेन उडते. परिणामी पिंप्रीसेकम, कठोरा खुर्द, कठोरा बुद्रूक आणि फुलगाव परिसरात राखेचा पाऊस पडतो. भुसावळ शहरातील वातावरणात देखील राखेचे कण आढळून येत आहेत. सध्या शहराची आद्र्रता 60 टक्क्य़ांपर्यंत पोहोचल्याने अंगाला चिकट घाम येत आहे. दरम्यान, विस्तारीत प्रकल्पातील राख जीवघेणी ठरत आहे. राखेतील विषारी घटकांमुळे पिके आणि मानवी शरीरावर विपरित परिणाम होत आहे. या संदर्भात महाजनको आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करण्यात येईल, असे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र साहेबराव चौधरी यांनी सांगितले.