आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजनिर्मिती: सुपर क्रिटिकल 660 मेगावॅटच्या प्रकल्पासाठी हालचाली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- दीपनगर औष्णिक विस्तारित वीजनिर्मिती केंद्रापाठोपाठ आता 660 सुपर क्रिटिकल कोळसाधिष्ठित प्रकल्पाच्या उभारणीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सप्टेंबर अखेरपर्यंत निविदा उघडून डिसेंबरपर्यंत प्राथमिक स्वरूपाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाजेनको प्रशासनानेही त्या संदर्भात तयारी सुरू केली आहे.

दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात 500 बाय दोनचा प्रकल्प उभारण्यात आला. भेल आणि टाटा या कंपन्यांनी हे काम पूर्ण केले. सध्या संच क्रमांक चारमधून व्यावसायिक वीजनिर्मिती पूर्ण करण्यात आली आहे. तर संच क्रमांक पाचच्या सीओडीचे काम अजूनही अपूर्णावस्थेत आहे. औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील 65 मेगावॅटचा संच क्रमांक एक कालबाह्य झाल्याने बंद करण्यात आला होता. यानंतर या संचाचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. या संचाच्या बदल्यात 660 मेगावॅटचा सुपर क्रिटिकल तंत्रज्ञान वापरलेला कोळसाधिष्ठित प्रकल्पाच्या उभारणीला मंजुरी देण्यात आली होती. यानंतर या प्रकल्पाची पर्यावरणीय जनसुनावणी घेण्यात आली.

जनसुनावणीला कें द्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने परवानगी दिल्याने उभारणी प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वीच महाजेनको प्रशासनाने आपल्या अधिकृत वेबसाइटवर 660 मेगावॅट प्रकल्पासाठी टेंडर नोटीस प्रसिद्ध केली होती. देशभरातील मोठय़ा कंपन्यांनी टेंडर (निविदा) प्रक्रिया पूर्ण केली आहे.

सप्टेंबर महिनाअखेर टेंडर उघडले जाण्याची शक्यता आहे. सप्टेंबरअखेर टेंडर मंजूर झाल्यास 660 मेगावॅट प्रकल्पाचे काम डिसेंबर 2013 पर्यंत प्राथमिक स्तरावर सुरू होईल. या आनुषंगाने महाजेनको प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत.

उच्चांकी निर्मिती
दीपनगर प्रकल्पात सध्या संच क्रमांक दोन (210), संच क्रमांक तीन (210) आणि संच क्रमांक चार आणि पाच प्रत्येकी (500) मेगावॅट स्थापित क्षमतेचे आहेत. अर्थात दीपनगरची स्थापित वीजनिर्मिती क्षमता सध्या 1420 मेगावॅटची आहे. राज्यात चंद्रपूर केंद्रानंतर दीपनगर केंद्राची स्थापित क्षमता द्वितीय क्रमांकावर असून 660 मेगावॅट विस्तारित प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यास ती 2080 मेगावॅट होईल.

कामाची निविदा मागवली
प्रस्तावित 660 मेगावॅट प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होईल. यासाठी निविदा मागवण्यात आली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत काम सुरूहोण्यासाठी प्रय} करू. अनंत देवतारे, मुख्य अभियंता, (स्थापत्य विभाग), महाजेनको