आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhusawal Division Best Performance In Central Railway

मध्य रेल्वेत भुसावळ विभागाचा डंका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील पाच विविध भागांना ‘जीएम शिल्ड’, तर तीन अधिकाऱ्यांना अाणि २१ कर्मचाऱ्यांना स्वतंत्र बक्षीस जाहीर करण्यात अाले अाहे. शुक्रवारी मंुबई येथे महाप्रबंधक सुनीलकुमार सूद यांच्या हस्तये बक्षिसांचे वितरण होईल, अशी माहिती वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक मनाेजकुमार गांगेय यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

भुसावळ विभागाला अनुक्रमे सेफ्टी, विद्युत, कार्मिक, अाराेग्य अाणि स्वच्छतेसाठी ‘जीएम शिल्ड’चा बहुमान मिळाला. याशिवाय स्काऊट गाइडचे उत्कृष्ट काम, बेस्ट इलेक्ट्रिक लाेकाे शेडसाठी ‘एमअाेएच शेड’, कुटुंबकल्याण कार्यक्रमासाठी ‘रेल्वे हाॅस्पिटल’, मालगाड्यांच्या चांगल्या देखभालीसाठी मॅकेनिक विभाग, नांदगाव येथील लाेकाे पायलट, गार्ड लाॅबी अाणि ट्रॅक मशीन रेल्वेरुळांची उत्तम व्यवस्था ठेवल्याबद्दल भुसावळ विभागाची बक्षिसासाठी निवड झाली अाहे. दरम्यान, १६ विभागांपैकी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागास यंदा प्रथमच ‘रेलमंत्री’ अवाॅर्ड जाहीर करण्यात अाला अाहे. मुख्य वाणिज्य प्रबंधकांना हे शिल्ड देण्यात येईल. त्यात भुसावळ विभागाचाही सिंहाचा वाटा अाहे. डीअारएम सुधीरकुमार गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकारी १० एप्रिलला मुंबईत हाेणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहणार अाहेत.

या अधिकाऱ्यांना जीएम अवाॅर्ड
भुसावळविभागातील वरिष्ठ अभियंता (समन्वयक) दिव्यकांत चद्रकार, वरिष्ठ मंडळ दूरसंचार टेलिकाॅम अभियंता मनाेज साेनी, सहायक यांत्रिक अभियंता ए.के.तिवारी यांना विभागातील २१ कर्मचाऱ्यांना ‘जीएम अवाॅर्ड’ जाहीर झाले आहेत.

विभागाचे तुलनात्मक उत्पन्न (कोटी)
प्रकार२०१४/१५ २०१५/१६ वाढ %
प्रवासी सेवा ५५०. ०६ ५५९.६० ११.९१
पेट्राेलियम वाहतूक २७७.८४ ३२०.४३ १५.३३
तिकीट चेकिंग १८.०७ -१८.६६ ३.२७
पार्सल विभाग ३९.८४ ४६.९९ १८
केळी वाहतूक ३.४८ १२.५८ २६२
जाहिरात उत्पन्न १.७२ २.२१ २९
वाहन पार्किंग ठेका १.३९ १.५४ १०.७९

भुसावळ विभागाला यंदा एकूण १,२२० काेटी १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले अाहे. त्यात तिकीट तपासणी, पार्सल, केळी वाहतूक, प्रवासी तिकीट अादींचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

भुसावळ रेल्वेस्थानकावर अप साइडिंगला मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर एक नवीन प्लॅटफाॅर्म तयार करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अाराखडा तयार केला अाहे. त्यास मंजुरी अाणि निधी मिळाल्यावरच कामाला सुरुवात होईल, असेही वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक मनाेजकुमार गांगेय यांनी सांगितले.

विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची पावती मिळाली अाहे. सामूहिक कामगिरीच्या बळावरच हे यश मिळाले. भुसावळ विभागाला बहुमान मिळाल्याचा आनंद वाटतो. भविष्यातही चांगल्या कामगिरीचा दर्जा टिकवून ठेवणार आहोत. सुधीरकुमार गुप्ता, डीअारएम, भुसावळ