आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर धरणाच्या पायथ्याशी 65 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प; शेतीला मिळणार 10 तास वीजपुरवठा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - जिल्ह्यातील पहिला ६५ मेगावॅट क्षमतेचा आणि तब्बल ३०० कोटी रुपये खर्चाचा सौरऊर्जा प्रकल्प सातपुड्यातील मोर धरणाच्या पायथ्याशी उभा राहणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास हजार शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीज मिळणे शक्य होईल. 
 
माेर धरणाच्या पायथ्याशी जलसंपदा विभागाची १२० हेक्टर जमीन वापराविना पडून आहे. येथे सौरऊर्जा प्रकल्प व्हावा यासाठी आमदार हरिभाऊ जावळेंनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यानंतर २२ ऑगस्ट २०१७ रोजी मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत प्रकल्पाला तत्वत: मंजुरी मिळाली. शुक्रवारी प्रकाशगड (मुंबई) येथून आलेले महाजनकोचे कार्यकारी अभियंता संतोष अहिर, सहायक अभियंता भारती कुरुमभट्टी, जनसोलचे वरिष्ठ अभियंता सिद्धेश गावडे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील अहिरे, महावितरण उर्वरित.पान १० 
 
३०० दिवस सौरप्रकाश 
सातपुड्यातवर्षातील सरासरी ३०० दिवस (नोव्हेंबर ते फेब्रुवारी) लख्ख सूर्यप्रकाश पडतो. त्यामुळे सौरऊर्जा निर्मितीचा प्रयोग यशस्वी होणे शक्य आहे. या प्रकल्पासाठी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या ३०० एकर जागेचे सपाटीकरण, कुंपण करण्यात येईल. बीओटी तत्वावरील या प्रकल्पाची वीज महावितरणला विक्री होईल. वीज वहनासाठी हिंगोण्याजवळ सबस्टेशन उभारणार. येथून १० किमीच्या आत येणाऱ्या ३३ केव्हीच्या उपकेंद्राना त्यानंतर कृषी फिडरला वीजपुरवठा होईल.

 पुढील महिन्यात निविदा निघणार 
शुक्रवारच्या सर्वेक्षणानंतर अधिकारी आता शासनाला प्रकल्प उभारणीचा आराखडा देतील. पुढील महिन्यात निविदा निघणे शक्य आहे. 
- हरिभाऊ जावळे, आमदार, रावेर
बातम्या आणखी आहेत...