आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुसावळ गोळीबार प्रकरण: सानियाची न्यायालयात हजेरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ: समीर पिंजारीवरील गोळीबारप्रकरणी कारागृहात असलेल्या सानिया कादरीला शुक्रवारी भुसावळ न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र, जामिनावर मुक्त असलेले दोन आरोपी हजर नसल्याने सानिया कादरीसह इतरांना पुन्हा 8 जून ही तारीख देण्यात आली. आरोपीतर्फे अँड. शाम गोंदेकर यांनी काम पाहिले.
माजी उपनगराध्यक्ष अख्तर पिंजारी यांचा मुलगा समीर याच्यावर गोळीबार प्रकरणी बांधकाम व्यावसायिक सानिया कादरी सध्या कारागृहात आहे.
संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणारी ही घटना 5 जानेवारी 2012 रोजी भुसावळ बसस्थानक परिसरात घडली होती. यानंतर सानियासह सय्यदअली कादरी, समीर कादरी, जमाल आदी आरोपी जळगाव कारागृहात होते. मात्र, कारागृहात कादरी परिवाराचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्याशी वाद झाल्याने सानियासह इतरांची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली होती. तर सानियाची आई, भाऊ, बहीण आणि अंगरक्षकाला जामीन मिळाला आहे. यानंतर इतरांना मिळालेल्या तारखेनुसार भुसावळ न्यायालयात हजर करण्यात येत आहे. शुक्रवारी सानिया कादरीला भुसावळ न्यायालयात न्यायाधीश अ.मा.पाटणकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. मात्र, जामिनावर असलेले दोन आरोपी हजर न झाल्याने पुन्हा 8 जून तारीख देण्यात आली. सुनावणीसाठी नाशिक येथून पोलिस बंदोबस्तात सानियाला आणले होते.