आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhusawal Firing Issue Criminal Saniya Kadri At Jail

न्यायालयासमोर पंचनाम्याचे व्हीडीओ शूटिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- भुसावळ येथील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेली सानिया कादरी आणि तिच्या परिवारातील सदस्यांच्या विरोधात सुरू असलेल्या खटल्यात शुक्रवारी न्यायाधीश डी. पी. सुराणा यांच्या न्यायालयात घटनेच्या पंचनाम्याचे व्हीडीओ चित्रण दाखविण्यात आले. सानिया कादरीने चालविलेल्या गोळीनंतर उरलेली पुंगळी याच घटनेतील एक आरोपी मोहंमद जमाल मोहंमद युनूस सिद्दिकी याने भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या शौचालयात फेकली होती. स्वच्छता कर्मचारी चंदेल याने ती पुंगळी काढून पोलिसांना दिली होती. या घटनेचे व्हीडीओ चित्रण करण्यात आले होते. पुंगळीचा पंचनामा करताना उपस्थित असलेला पंच साक्षीदार भगवान पाटील यांची शुक्रवारी सरतपासणी आणि उलटतपासणी घेण्यात आली. आरोपींतर्फे अँड. प्रकाश बी. पाटील आणि अँड. व्ही. एच. पाटील, तर सरकार पक्षातर्फे अँड. गोपाळ जळमकर यांनी काम पाहिले.