आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अवजड वाहतुकीपासून मुक्ती कधी? जीवघेण्या घटना कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - वाढती रहदारी बेशिस्त वाहतुकीचे कारण ठरू नये. अपघातांना आळा बसावा आणि पालिका हद्दीतील रस्त्यांचे नुकसान टाळण्यासाठी मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर दिवसा अवजड वाहनांना बंदी आहे. शहरात मात्र हा नियम सर्रास पायदळी तुडवला जातो. सिग्नल यंत्रणाही बंद आहे. सतारे भाग ते गांधी पुतळ्यापर्यंतच्या भागात वर्षभरात दोघांचा बळी गेला. तरीही रिंगरोडचे अडलेले घोडे पुढे दामटण्यास पालिका तयार नाही.

मोटार वाहन कायद्यानुसार 12 टन निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांना शहरातून जाण्यासाठी बंदी आहे. अवजड वाहतुकीवर शहर वाहतूक पोलिस शाखा आणि पालिका प्रशासन या दोन्ही यंत्रणांनी नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जळगाव ते यावलरोड दरम्यान या समस्येची तीव्रता जास्त आहे. मात्र, या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यापूर्वी पर्यायी मार्ग गरजेचा आहे. शहरात मात्र अनेक वर्षांपासून रिंगरोडचे भिजत घोंगडे कायम आहे. परिणामी शहरातून जाणार्‍या रस्त्याचा वापर करण्याशिवाय अवजड वाहनांजवळ दुसरा पर्याय नाही.

शहरातून गेलेल्या जळगाव-यावल रोडवर वर्षभरात अवजड वाहनांखाली सापडून दोघांचा बळी गेला. किमान यानंतर तरी पालिकेला जाग येणे अपेक्षित होते. शहरवासीयांच्या दुर्दैवाने अशी कोणतीही हालचाल अजून झालेली नाही. रिंगरोड रखडल्याने जळगावरोड आणि यावलरोडवरून अवजड वाहने जातात. मात्र, घासीलाल वडेवाला आणि गांधी पुतळ्यापासून या वाहनांना शहरात प्रवेश बंदी आहे. तरीही अधून-मधून होणारी घुसखोरी कायम आहे. पालिका आणि वाहतूक शाखेने ‘नो एंट्री’ लिहिलेले फलक न लावल्याने अपरिचित वाहनचालकांचा संभ्रम वाढतो. गेल्या महिन्यात अवजड आकाराचे कंटनेर थेट पालिका दवाखान्यापर्यंत आल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. वारंवार होणारे हे प्रकार टाळण्यासाठी दर्शनी भागात ‘नो एंट्री’चे फलक आवश्यक आहेत.

रस्ते अल्पायुषी
शहरांतर्गत रस्ते हलक्या वाहनांची वर्दळ डोळ्यासमोर ठेवून तयार होतात. डांबरी रस्ते सात वर्षांनंतर पुन्हा बांधावेत, असा नियम आहे. तर काँक्रिटच्या रस्त्यांचे आयुष्यमान 25 वर्षांचे मानले जाते. मात्र, शहरात होणार्‍या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे या रस्त्यांची वाट लागते.

आर्थिक अडचणी
रिंगरोडचे रखडलेले काम हाती घेवू. बहुतांश भागातील रस्ता विस्तारीकरण झाले आहे. मात्र, शांतीनगरातील एका पुलाचे विस्तारीकरण रखडले आहे. नगरोत्थान योजनेतून हे काम प्रस्तावित आहे. सध्या पालिकेची आर्थिक स्थिती दोलायमान असल्याने अडचणी आहेत. अनिल जगताप, मुख्याधिकारी, भुसावळ