आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळमधील वादग्रस्त जागेवरील आरक्षणाचा ठराव रद्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - भुसावळच्या राजकारणात गेल्या दोन वर्षांत प्रचंड उलथापालथ झाली. ज्या भूखंडामुळे या घडामोडी घडल्या, त्या जागेवर नगरपालिकेने टाकलेला आरक्षणाचा ठराव जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी सोमवारी रद्द केला. यासंदर्भात बांधकाम व्यावसायिक चंद्रशेखर अत्तरदे यांनी तक्रार केली होती.

भुसावळ शहरातील सतारे गट सर्वे क्रमांक 78/1 वर पालिकेने आरक्षण टाकले होते. 14 जून 2011 रोजी झालेल्या सभेत आयत्यावेळचा ठराव करून (क्र. 32) हे आरक्षण टाकण्याचा निर्णय झाला होता. याबाबत चंद्रशेखर अत्तरते यांनी तक्रार केली होती. त्या तक्रारीवर दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यावर जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजुरकर यांनी आरक्षण टाकण्यासाठी केलेला ठराव रद्द केला. सोमवारी यासंदर्भात आदेश काढले. जिल्हाधिकार्‍यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पालिका वतरुळात कमालीची खळबळ उडाली आहे. यासंदर्भात सत्ताधारी गटातील नगरसेवकांना विचारणा केली असता थेट कानावर हात ठेवून बोलण्यास नकार दिला. दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांनी यापूर्वीच पालिकेतील 30 कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीचा ठरावही निलंबित केला. स्वीकृत नगरसेवक जगन सोनवणे यांच्या अपात्रतेचे आदेश काढले.

सत्यामुळेच न्याय मिळाला
माझी सत्य बाजू होती. या मुळेच मला न्याय मिळाला. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना आवश्यक पुरावे दिले होते. या आधारावर मला न्याय मिळाला आहे. चंद्रशेखर अत्तरदे, तक्रारदार, जळगाव